Haryana Violence,हरयाणात उसळला हिंसाचार; विहिंपच्या मिरवणुकीवर दगडफेक, गृहरक्षक दलाचे २ जवान मृत्यूमुखी – haryana riots stone pelted in 12 police injured 2 people death

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वृत्तसंस्था, गुरुग्राम/चंडीगड : हरियाणातील गुरुग्रामजवळच्या नूह शहरात विश्व हिंदू परिषदेने सोमवारी काढलेल्या एका धार्मिक मिरवणुकीदरम्यान मोठी दंगल उसळली. या मिरवणुकीवर काही तरुणांनी जोरदार दगडफेक केली; तसेच मिरवणुकीतील वाहनांना आग लावली. या जमावास पांगवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गृहरक्षक दलाचा एक जवान जमावाने केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडला. ‘येथील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास आमचे प्राधान्य असून, शेजारच्या जिल्ह्यांतून अतिरिक्त सुरक्षा दले पाचारण करण्यात आली आहेत,’ अशी माहिती हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी दिली. धार्मिक तणाव वाढू नये यासाठी येथील मोबाइल इंटरनेट सेवा बुधवारपर्यंत खंडित करण्यात आली आहे.

डझनभर पोलिसही जखमी

दंगेखोरांनी केलेल्या गोळीबारात डझनभर पोलिस जखमी झाले. तसेच, गृहरक्षक दलाचा एक जवान मृत्युमुखी पडला. यातील पोलिस उपअधीक्षक सज्जन सिंग यांच्या डोक्यात तर, अन्य एका पोलिस निरीक्षकाच्या पोटात गोळी लागली आहे. सुमारे बारापैकी आठ पोलिस कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. ही दंगल चिघळू नये यासाठी पूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
मणिपूर ‘धिंड’प्रकरणाची CBI करणार चौकशी; मोबाईलने VIDEO शूट करणाऱ्या आरोपीला अटक
विरोध कशामुळे?

ही यात्रा का रोखण्यात आली याविषयी विविध दावे करण्यात येत आहेत. वल्लभगड येथील बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने सोशल मीडियावर एक आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट केल्याचा राग आल्याने ही यात्रा रोखण्यात आली, असा दावा काही जणांनी केला. तसेच, दोन जणांच्या हत्येचा आरोप असणारा मोनू मानेसर हा गोरक्षक या यात्रेत सहभागी होणार असल्याच्या चर्चेमुळे या यात्रेस विरोध करण्यात आला, असाही दावा काहींनी केला. मात्र धार्मिक तणाव वाढू नये यासाठी विश्व हिंदू परिषदेने केलेल्या सूचनेनंतर मी या यात्रेतून अंग काढून घेतले, असे मानेसरने वृत्तसंस्थेस सांगितले.

[ad_2]

Related posts