PM Modi Pune visit: लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, दोन मेट्रोंचंही करणार उद्घाटन

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Modi Pune visit:  पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत.. लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रदान करण्यात येणार आहे. आणि पुरस्कार सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यात अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.तसंच पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करणार आहेत. यामध्ये अंडरग्राउंड मेट्रोचा देखील समावेश आहे.सोबतच अनेक कार्यक्रमही नियोजित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे पुण्यात आज वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहे.

’या’ मार्गांवरील वाहतुकीत बदल

पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, सेवासदन चौक, अलका चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, गोल्फ क्लब चौक, विमानतळ रोड इत्यादी ठिकाणांवरील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी गैरसोय होऊ नये, यासाठी या मार्गांचा वापर टाळून अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.

सारसबागेकडे जाणारा मार्ग खुला

टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज चौकात आल्यानंतर ना. सी. फडके चौकाकडे जाण्यासाठी (एस. पी. कॉलेज चौकातून) उजवीकडे जाणारा मार्ग खुला करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.

जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद

जेधे चौकातून सारसबागेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावर जाण्यासाठी जेधे चौकातून सातारा रोड, मित्रमंडळ चौक, सावरकर चौक मार्गे सिंहगड रस्ता या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे. सिंहगड रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी सावरकर चौक, मित्रमंडळ चौक, व्होल्गा चौक, जेधे चौक या मार्गाचा वापर करण्याचं अवाहन करण्यात आलं आहे. जेधे चौकातील फ्लायओव्हरवरून सारसबागेकडे जाण्यास प्रवाशांना बंदी घालण्यात आली आहे.

पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.

[ad_2]

Related posts