PM Modi Pune Visit Devendra Fadanvis Talk About Pune Metro And All Developments In Pune City

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Pune Visit Devendra Fadanvis : जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी (PM Modi Pune) यांनीच पहिल्या मेट्रोचं उद्घाटन केलं आणि आज दुसऱ्या टप्प्याचंही उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येत आहे ही मोठी गोष्ट असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी म्हटलं आहे. पुण्याला उत्तम नाही तर सर्वोत्तम करु, असं आश्वासन पुणेकरांनी त्यांनी दिलं आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाच्या वेळी अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मी होतो. मात्र त्यावेळी आम्ही वेगवेगळ्या भूमिकेत होतो मात्र सगळ्यांच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.”

आगामी काळात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, हे पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु, असं ते म्हणाले. पुणे ही जशी उद्योग नगरी आहे तशीच स्वप्न पूर्ण करणारी नगरी म्हणूनही आम्ही पुण्याचा विकास करु, असाही विश्वास त्यांनी पुणेकरांना दिला आहे. पुणे हे राज्यातीलच नाही तर देशातील उत्तम शहर आहेत मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सर्वोत्तम पुणे करुन दाखवू, असंही ते म्हणाले. 

पुणे मेट्रोमुळे अनेकांना फायदा होणार

पुणे मेट्रोमुळे अनेकांना फायदा होणार आहे. ज्या दोन मार्गिका आता तयार करण्यात आल्या आहेत. त्या मार्गिका दोन मार्गांना क्रॉस होणाऱ्या आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा प्रवास सोपा होणार आहे. ज्यावेळी मेट्रोचे सर्व मार्ग तयार होतील त्यावेळी पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी होईल, असं देखील त्यांनी सांगितलं. मेट्रोसोबतच पुणे PMPML बाबत निर्णय घेत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस घेतल्या. आज देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसेसची फ्लिट ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. कोणतंही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिली पाहिजे, असं मोदींचं स्वप्न आहे. हिच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वात आधी पुण्यात होत आहे. ही पुण्यासाठी आणि राज्यासाठी चांगली बाब असल्याचं ते म्हणाले. 

पुण्य़ाला स्वप्नपूर्तीची नगरी अशी ओळख निर्माण करुन देऊ!

पिंपरी-चिंचवडच्या वेस्ट एनर्जीची 2018 साली सुरुवात केली. त्याचा देखील पुण्याला फायदा होणार आहे. याच ठिकाणी पुण्याला गती देणाऱ्या अनेक योजनांचं लोकार्पण होत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घरं सुपूर्द केली जाणार आहे. यातूनच मोदींचं एकही व्यक्ती बेघर राहणार नसल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. त्यासाठी पुणे प्रशासन निश्चितपणे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी पुणेकरांना दिला आहे. पुणे हे सांस्कृतिक नगरीसोबतच औद्योगिक नगरीदेखील आहे आणि स्टार्टअप नगरी आहे. पुण्याला स्वप्नपूर्तीची नगरी अशी ओळख निर्माण करुन देऊ, असंही ते म्हणाले. 

हेही वाचा-

PM Narendra Modi Pune Visit Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं भरभरुन कौतुक; म्हणाले जगभरात…

[ad_2]

Related posts