Shukra Ast 2023 : आज शुक्र अस्तमुळे ‘या’ राशी होणार धनवान! तुमची रास यात आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Venus Combust 2023 Impact : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांमध्ये शुक्र हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा धन, विलास, भौतिक सुख, प्रेम, प्रणय यांचा कारक मानला जातो. आज शुक्र ग्रह अस्त स्थिती येणार आहे. संध्याकाळी 07:37 वाजता शुक्र सिंह राशीत अस्त स्थितीत येणार आहे. (shukra ast 2023 venus combust today these zodiac signs will become rich astrology news)

 

‘या’ राशींना होणार श्रीमंत?

वृश्चिक (Scorpio)

शुक्राच्या अस्ताचा या राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभदायक ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजूबत होणार आहे. भौतिक सुखसुविधा वाढणार आहेत. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. या काळात खर्च झाला तरी तुम्ही पैसे वाचविण्यात यशस्वी होणार आहात. 

मकर (Capricorn)

मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र प्रतिगामी फलदायी ठरणार आहे. लांबच्या प्रवासाला जाणार आहात. नोकरीत तुमची स्थिती सुधारणार असून तुम्हाला जास्त मेहनत केल्यास त्याचे फळ मिळणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना यामुळे अधिक फायदा होणार आहे. लव्ह लाइफसाठी काळ सकारात्मक असणार आहे. 

वृषभ (Taurus) 

शुक्र अस्त वृषभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या राशीला त्याचा लाभ मिळणार आहे. भौतिक आणि चैनीच्या वस्तू, कपडे, दागिने तुम्ही खरेदी करणार आहात. आर्थिक फायदा होणार आहे. अविवाहित लोकांचा जोडीदाराचा शुभ संपणार आहे. तुमच्या तिजोरीमध्ये लक्ष्मीचा वास असणार आहे. पैशा आल्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. 

सिंह (Leo)

शुक्र अस्तामुळे सिंह राशीच्या लोकांना संपत्ती, प्रतिष्ठा आणि सन्मान मिळणार आहे. अकडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या योजनाला यश मिळेल. गुंतवणुकीतून मोठा फायदा होणार आहे. रखडलेली कामं सहज होणार आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवणार आहात. तुमची तिजोरी पैसे ठेवण्यासाठी लहान पडणार आहे. प्रेमसंबंधासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. 

कर्क (Cancer)

शुक्र ग्रहाची अस्त कर्क राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.  तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच चमक प्राप्त होणार आहे. योजनांमध्ये यश मिळेल. भागीदारीच्या कामात प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts