Pune Crime Youtuber Used Girls To Become Famous On YouTube Tortured And Demand Of Money By Pulling In Love

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime : सध्या अनेक तरुण-तरुणींना सोशल मीडियावर (Social Media) फेमस होण्याचं वेड लागलं आहे. व्हायरल होण्यासाठी अनेक लोक काही ना काही व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. असे व्हिडीओ बनवणाऱ्या मुलांवर मुली भाळतात आणि याचाच फायदा एका युट्युबरने घेतला आहे. हा युट्युबर तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अत्याचार करत असल्याचा  धक्कादायक प्रकार आता उघडकीस आला आहे. युट्युबरने अनेक तरुणींची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. संबंधित युट्युबराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवनाथ सुरेश चिखले (रा. पुणे) असं अटक केलेल्या युट्युबरचं नाव आहे.

नेमका काय प्रकार घडला?

युट्युबरच्या जाळ्यात अडकलेल्या अशाच एका तरुणीने पोलीस ठाण्यात सदर प्रकाराची तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबासह राहते. तर आरोपी युट्युबर नवनाथ चिखले हा पुण्यात राहणारा असून तो मनोरंजन म्हणून युट्युबवर गाण्यांचे अल्बम तयार करतो, त्यामुळे तो  युट्युबर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यातच फेब्रुवारी 2021 ला पीडित तरुणीने शादी डॉट कॉमवर नाव नोंदणी करून आपलं प्रोफाईल अपलोड केलं होतं. हेच प्रोफाईल पाहून आरोपीने शादी डॉट कॉमवर लग्नास उत्सुक असल्याचा मॅसेज पाठवून पिडीतेकडून तिचा मोबाईल नंबर मिळवला. त्यानंतर पीडितेला युट्यूबवरील स्वतःचे रील आणि व्हिडीओ दाखवून आकर्षित करत पीडितेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.

मुलाच्या नादी लागून दागिनेही विकले, लाखोचं कर्जही काढलं

सुरुवातीला युट्युबरने काही बहाण्याने पीडित मुलीला आपल्या बँक अकाऊंटवर अडीच लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले, त्या मुलीने ऑनलाईन पैसे पाठवले. त्यातच जून 2021 मध्ये आरोपी मुलीच्या घरी आला आणि घरात एकटीला पाहून शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र मुलीने नकार देताच, आता आपण लग्न करणार आहोत, असं बोलून त्याने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीने लग्नाचा तगादा लावला असता, आरोपीने सांगितलं की, त्याला अजून युट्युबमध्ये करियर बनवायचं आहे, घर घ्यायचं आहे आणि त्यासाठी खूप पैसे लागतील, असे बहाणे तो देऊ लागला. त्यानंतर पीडित मुलीने घरातील दागिने विकून आणि बँकेतून कर्ज काढून युट्यूबरला 47 लाख 50 हजार रुपये दिले. यानंतर आता तर लग्न करू शकतो ना? असा तगादा पीडितेने लावताच त्याने उडवाउडवीची उत्तरं देत  लग्नास नकार दिला.

सापळा रचून आरोपीला केली अटक

लग्नाचं अमिष दाखवून आपली लाखो रूपयांची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली, घडलेला सर्व प्रसंग पोलिसांना सांगताच त्यांनीही डोक्यावर हात मारून घेतला. मात्र प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसानी तात्काळ आरोपी नवनाथ चिखलेवर भादंवि कलम 376, 420 कलमांनुसार गुन्हा दाखल केला. कल्याण-भिवंडी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केलं असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लुटारु मुलांपासून सावध राहा

दरम्यान, आरोपी पोलीस कोठडीत असताना आणखी काही गोष्टी समोर आल्या. आरोपीने युट्युबवर फेमस होण्यासाठी आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी अशाच प्रकारे बऱ्याच तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. युट्यूबर नवनाथच्या मोबाईलमध्ये शेकडो मुलींचे नंबर असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यामुळे तरुणींनी अशा तरुणांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हेही वाचा:

Nagpur Online Fraud : आधी 17 कोटींची रोकड, सोनं, चांदी जप्त; आता साडेचार कोटींचं सोनं ताब्यात, आरोपीच्या लॉकरमध्ये घबाड

[ad_2]

Related posts