Mysterious Alien Weapon Found This Metal Is Not From Earth Scientist Investigating; एलियनचं शस्त्र मिळालं, हा धातू पृथ्वीवर सापडत नाही, पाहून शास्त्रज्ञही हादरले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: जगात अनेकदा अशा काही गोष्टी सापडत असतात ज्या पाहून आपल्याला आश्चर्य वाटतं. असंच काहीसं बर्न विद्यापीठाच्या संशोधकांना सापडलं आहे. नुकतंच संशोधकांना असं एक शस्त्र सापडले आहे, जे उल्केपासून बनलेले आहे. हे बाणासारखं दिसणारं शस्त्र १.५ इंच लांब आहे आणि त्याचे वजन फक्त ०.१०२ औंस आहे. बर्न विद्यापीठाच्या संशोधकांना हे शस्त्र स्वित्झर्लंडमधील लेक बीलवरील मोरीगेन (Morigen) या पुरातत्व स्थळावर सापडले आहे. या बाणाच्या शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येकजण त्याची चाचणी करण्यात गुंतले आहे.

‘डेलीमेल’ न्यूज वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, भूगर्भशास्त्रज्ञांनी या शस्त्राचे परीक्षण केले तेव्हा त्यांच्यासमोर एक धक्कादायक माहिती आली. त्यांना असे आढळले की ज्या धातूपासून हे शस्त्र बनवले गेले आहे त्यात अॅल्युमिनियम-२६ देखील समाविष्ट आहे. अॅल्युमिनिअम-२६ हा एक अल्पायुषी आयसोटोप आहे, जो एकेकाळी सूर्यमालेत मुबलक प्रमाणात होता. परंतु हा धातू पृथ्वीवर आढळत नाही.

Seema Haider: सीमा हैदरला सिनेमाची ऑफर, रिहर्सलसाठी डायलॉग्सही पाठवले, पाहा कोणता रोल मिळाला?
हा शोध महत्त्वाचा शोध असल्याचं मानलं जात आहे, कारण तो मध्य युरोपमध्ये सापडलेल्या तीन एलियन धातूंपैकी एक आहे. अभ्यासानुसार, इतर दोन पोलंडमध्ये सापडलेले कडे आणि कुऱ्हाडीच्या वरचा भाग होता.

Alien Weapon

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

तुतनखामुनचा खंजीर: १९२५ मध्ये हा खंजीर इजिप्शियन फारो तुतनखामुनच्या थडग्यात सापडला होता. २०१६ मध्ये, पॅरिसमधील पियरे आणि मेरी क्युरी विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की त्यात वापरलेले लोह पृथ्वीच्या बाहेरून जमिनीवर पडले असावे. म्हणजेच उल्केतून हा धातू पृथ्वीवर पडले असावे ज्यातून हे खंजीर बनवले गेले. हे खंजीर १९२५ मध्ये पुरातत्वशास्त्रज्ञ हॉवर्ड कार्टर यांनी सोन्याच्या ब्लेडसह आणखी एका खंजीरसह शोधला होता.

डोक्यात फावड्याने वार करुन बापाने लेकाला संपवलं, मग कटरने… घटनेनं अख्खं सांगली हादरलं

[ad_2]

Related posts