Prataprao Borade Passed Away Trustee Of Mahatma Gandhi Mission Prataprao Borade Death

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य  प्रतापराव बोराडे (Prataprao Borade)  यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.  आज (5 ऑगस्ट) सकाळी पावणे बारा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर औरंगाबादच्या एमजीएम स्टेडियम  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar)  यांनी देखील ट्वीट करत प्रतापराव बोराडे  यांना श्रद्धांजली वाहिली असून, दुःख व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे प्रताप बोरडे आणि शरद पवार यांचे घनिष्ठ मैत्री होती.  छत्रपती संभाजीनगरचा दौरा असला की शरद पवार  आणि बोराडे यांची भेट ठरलेली असायची.

शरद पवारांचे ट्वीट… 

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत,महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त,विद्या प्रतिष्ठान,बारामतीचे माजी प्रशासकीय अधिकारी, ऋषीतुल्य विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आज दुःखद निधन झाल्याची बातमी समजली. मागील पाच दशके प्रतापरावांचा आणि माझा स्नेह होता.जगभरात एखादा देश क्वचितच आढळेल जिथे त्यांचा विद्यार्थी सापडणार नाही.आपल्या ज्ञानदानाने व उत्तम प्रशासकीय कौशल्याने त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था नावारूपास आणल्या.राज्यातील अनेक परिवर्तनवादी संघटना व संस्था यांच्यासोबत त्यांचा संवाद होता.मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ते आग्रही होते.आज त्यांच्या निधनाची बातमी ही मला वैयक्तिक वेदनादायी आहे.त्यांच्या कुटुबियांना व एमजीएम परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो.

मराठवाड्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांमध्ये प्राचार्य प्रताप बोराडे यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्काराने त्यांना 2020 साली गौरविण्यात आले होते.  बोराडे हे दोन दशकाहून अधिक काळ जवाहरलाल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. ते अभियांत्रिकीचे दुहेरी पदवीधर होते. त्यांना विविध व्यावसायिक संस्थांशी संपर्क आणि संबंध होता.

हे ही वाचा :                 

N D Mahanor : देशात ठिबक सिंचनाचा पहिला संच ना. धों. महानोर यांच्या शेतात, ते पाणी आडवा पाणी जिरवा योजनेचे जनक : अशोक जैन 

 



[ad_2]

Related posts