Crocodile Kills Soccer Player In Costa Rican River; मगरीच्या हल्ल्यात फुटबॉलपटूचा मृत्यू

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सॅन जोस: कोस्टारिकाच्या फुटबॉलपटूचा मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. नदीत पोहायला गेला असताना फुटबॉलपटूवर मगरीनं हल्ला केला. खेळाडूचा मृतदेह मगरीसोबत नदीच्या पृष्ठभागावर दिसल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. कोस्टा रिकाच्या गुआनाकास्ट प्रांतातील रियो कैनासमधील नदीत फुटबॉलपटू पोहायला गेला होता. जीसस अल्बर्टो लोपेज ऑर्टिज असं फुटबॉलपटूचं नाव आहे. ऑर्टिज नदीत पोहत असताना तिथे एक मगर आली. तिनं ऑर्टिजवर हल्ला केला. आसपासच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात ते अपयशी ठरले.

२९ वर्षांचा फुटबॉलपटू नदीत पोहण्यासाठी गेला असताना त्याला मगरीनं पकडलं. मगरीच्या हल्ल्यात ऑर्टिजचा जीव गेला. ऑर्टिजचा मृतदेह मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मगरी त्याचा मृतदेह सोडत नव्हती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी मगरीवर गोळी झाडली. मगरीवर गोळी झाडली नसती तर मृतदेह मिळवणं अवघड गेलं असतं, असं पोलिसांनी सांगितलं. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला आहे.

फुटबॉलपटू जीसस अल्बर्टो लोपेझ ऑर्टिज हा चुचो नावानं प्रसिद्ध होता. डेपोर्टिवो रियो कैनास टीमकडून तो फुटबॉल खेळायचा. त्याला दोन मुलं आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबानं लोकांकडे मदतीची मागणी केली. डेपोर्टिवो रियो कैनास टीमचे मॅनेजर लुईस कार्लोस मोंटेस यांनी ऑर्टिजच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ऑर्टिजच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं. ऑर्टिजच्या निधनाबद्दल त्याच्या क्लबनं दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पित केली.

[ad_2]

Related posts