West Indies Won The Toss & Decided To Bat First India Is Unchanged For 4th T20I

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

West Indies vs India, 4th T20I : फ्लोरिडा येथील चौथ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार रोवमन पॉवेल याने नाणेफेक जिंकून भारताला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. करो या मरोच्या सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. तिसऱ्या सामन्यातील विजयी संघ मैदानात उतरवला आहे. वेस्ट इंडिजच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. 

वेस्ट इंडिजच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. जेसन होल्डर याने दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. त्याशिवाय अनुभवी शाय होफ याला संधी देण्यात आली आहे. चार्ल्स याला वगळण्यात आलेय.

भारताची प्लेईंग 11 –

यशस्वी जायस्वाल, शुभमन गिल, सुर्यकुमार यादव (उपकर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार

वेस्ट इंडिजचे 11 शिलेदार कोणते ?

ब्रेंडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोवमैन पॉवेल (कर्णधार), शिम्रोन हेटमायर, जेसन होल्डर, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, अकील होसेन, ओबेद मैककॉय

युवा ब्रिगेड कमाल करणार का ?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज चौथा टी 20 सामना रंगणार आहे. पाच सामन्याच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2-1 ने आघाडी घेतली आहे. पहिले दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले होते. तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने कमबॅक केले. आज चौथा टी20 सामना फ्लोरिडा येथे रंगणार आहे. हा सामना जिंकून विडिंज मालिका खिशात घालणार की भारत जिंकून बरोबरी  साधणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. मागील सात वर्षांत वेस्ट इंडिजला भारताविरोधात टी20 मालिका जिंकता आली नाही. कॅरेबिअन आर्मीने 2016 मध्ये अखेरची टी20 मालिका जिंकली होती. 

पहिल्या दोन सामन्यात फ्लॉप गेलेल्या सूर्यकुमार यादव याने तिसऱ्या सामन्यात विडिंजची गोलंदाजी फोडून काढली. तिलक वर्मा याने सूर्यकुमार याला चांगली साथ दिली. तिलक वर्माने तिन्ही सामन्यात दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. सलामी फलंदाज शुभमन गिल तिन्ही सामन्यात फेल गेला. पदार्पण करणारा यशस्वी जयस्वाल यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही. कर्णधार हार्दिक पांड्यालाही अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत कुलदीप आणि चहल यांनी प्रभावी कामगिरी केली आहे. हार्दिकनेही अचूक टप्प्यावर मारा केलाय. आज होणाऱ्या चौथ्या टी20 सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतोय ? याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागलेय. 

[ad_2]

Related posts