Royal Challengers Bangalore fame Sri Lanka All Rounder Wanindu Hasranga Retired From Test Cricket Informs Sri Lanka Board Know the Reason; श्रीलंकेच्या स्टार अष्टपैलू खेळाडूने अचानक कसोटीत घेतली निवृत्ती, कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने स्वतः श्रीलंका क्रिकेट बोर्डाला याची माहिती दिली आहे. हसरंगाने आपल्या निर्णयामागे महत्त्वाचे कारणही दिले आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये बराच काळ खेळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे त्याने म्हटले आहे. हसरंगा आयपीएलमध्येही खेळतो. तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करतो.

श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने व्हाईट-बॉल फॉरमॅटमध्ये (ODI आणि T20 क्रिकेट) आपली कारकीर्द सुरू ठेवण्याचे वचन देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वानिंदू हसरंगाने यासंदर्भात श्रीलंका क्रिकेटला पत्र लिहिल्याचे वृत्त आहे. पत्रात वानिंदू हसरंगाने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याची आणि राष्ट्रीय संघासाठी सर्वोत्तम योगदान देण्याची इच्छा नमूद केली आहे.

जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात ‘नवी’ टीम इंडिया आयर्लंडला रवाना, पाहा मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
वानिंद हसरंगाने ठळकपणे सांगितले आहे की मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये स्पेशालिस्ट म्हणून आपली कारकीर्द घडवण्याचे त्याचे ध्येय आहे. त्याच्याकडून त्याच्या क्षमतेनुसार देशाची सेवा करणे अपेक्षित आहे. “आम्ही त्याचा निर्णय स्वीकारू आणि आम्हाला विश्वास आहे की हसरंगा पुढे जाणाऱ्या आमच्या व्हाईट-बॉल क्रिकेटचा एक महत्त्वाचा भाग असेल,” असे श्रीलंका क्रिकेटचे सीईओ ऍशले थिसिल्वा यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

डिसेंबर २०२० पासून एकही कसोटी विकेट नाही

वानिंदू हसरंगाचा कसोटी क्रिकेटमधील विक्रम फारसा मोठा नाही. हसरंगाने आपल्या जवळपास ३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत केवळ ४ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला केवळ ४ विकेट घेता आल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने या चार विकेट घेतल्या. त्यानंतर वानिंदू हसरंगाने आणखी ३ कसोटी खेळल्या, परंतु त्यापैकी एकाही कसोटीत त्याला यश मिळाले नाही. हसरंगाने त्याचा शेवटचा कसोटी सामना एप्रिल २०२१ मध्ये बांगलादेशविरुद्ध पल्लिकले येथे खेळला होता.

कर्णधारपद हार्दिक पंड्याला शोभत नाही? भारताच्या भावी Captainची कामगिरी तरी पाहा

[ad_2]

Related posts