[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
आयपीएल 2023 (IPL 2023) चा पहिला क्वालिफायर (Qualifier 1) सामना चेन्नईतील चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) चेन्नई आणि गुजरात या संघात खेळवला जाणार आहे. आयपीएलचा यंदाचा सोळावा हंगाम फारच रोमांचक ठरला आहे. शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शर्यत सुरु होती. आज आयपीएल 2023 मधील पहिला क्वालिफायर गतविजेता गुजरात टायटन्स संघ आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघ यांच्यात संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे.
पहिला क्वालिफायर सामना चेन्नई विरुद्ध गुजरात
चेन्नई आणि गुजरात हे दोन संघ यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी संघ ठरले आहेत. गुजरात संघाने 14 पैकी 10 सामने जिंकून 20 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. दुसरीकडे, चेन्नई संघाने 14 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळवून 17 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे गुजरात आणि चेन्नईमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र, या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरणार आहे जाणून घ्या.
गुजरात संघाचं पारड जड
यंदाच्या आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई संघावर पांड्याचा गुजरात संघ भारी पडला आहे. गुजरात संघ हंगामाच्या सुरुवातीपासूनच टॉप 4 मध्ये पाय रोवून आहे. आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई संघाला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई संघाने खातं थोडं उशिरा उघडलं मात्र, शेवटी चेन्नई संघानं दमदार प्रदर्शन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं.
गुजरात संघ चेस मास्टर
गुजरात टायटन्स संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची फलंदाजी. गुजरात संघ चेस मास्टर आहे. आतापर्यंत त्यांनी आव्हानाचा पाठलाग करताना फक्त तीन सामने गमावले आहेत. त्याचबरोबर गुजरातची गोलंदाजीही काही प्रमाणात चांगली आहे. त्यांच्या फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली आहे. पण वेगवान गोलंदाजी त्यांची बाजू कमजोर आहे. मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्यास संघाला खूप अडचणीत येतात.
चेन्नईची टॉप ऑर्डर जमेची बाजू
चेन्नई सुपर किंग्सची सर्वात मोठी ताकद ही त्यांची टॉप ऑर्डर आहे. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्या फलंदाजीला तोड नाही. याशिवाय शिवम दुबेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये धावा जमवताना दिसत आहे. पण या तीन फलंदाजांव्यतिरिक्त मधल्या फळीतील किंवा खालच्या मधल्या फळीतील कोणत्याही खेळाडूला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. गुजरातविरुद्धच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यामध्ये चेन्नईची आघाडीची फळी ढासळली तर त्यामुळे गुजरात संघाला फायदा होऊ शकतो.
[ad_2]