[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नमन लुथराने सांगितले की, सगळी कागदपत्रे पुर्ण असूनही शाहलीनला अनेक वेळा विजा देण्यास नकार दिला होता. आता लग्नानंतर दोन्ही कुटुंब आनंदी आहेत. वकील नमन आणि लाहोरमध्ये राहणारी शाहलीन जावेद हे लांबचे नातेवाईक आहेत. लथूरा काही कामानिमित्ताने पाकिस्तानमधील त्याच्या मित्राकडे गेला होता. ज्याने १९४७ नंतर पाकिस्तानात राहणं स्विकारलं होतं. त्यावेळी त्या दोघांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेम झाले.
लुथराचे कुटुंबाने लाहोरमधून बटालामध्ये स्थलांतरण केले होते. त्याच्या आजोबांनी कुटुंबासह लाहोरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता, मात्र नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्विकारला. दोन्ही कुटुंबे विभागली गेली असली तरी देखील दोन्ही कुटुंबे एकमेकांच्या संपर्कात होते. नमन आणि शाहलीनने त्यांच्या नातेवाईकांना सांगितले की, ते एकमेकांजवळ लग्न करण्यास इच्छूक आहेत. त्यांच्या या निर्णयाला घरातूनही परवानगी मिळाली. त्यानंतर त्यांनी २०२६ मध्ये साखरपुडा केला. त्यानंतर २०१८ मध्ये शाहलीन बटाला येथे आली. मात्र त्यानंतर अनेक कारणांनी तिला विसा देण्यास नकार दिला गेला.
करतारपुर कॉरिडोर उघडल्यानंतर दोघे मागील वर्षी गुरुद्वारा दरबार साहिबमध्ये भेटले होते. गुरदासपुरमधील कादियांतील सामाजिक कार्यकर्ता चौधरी मकबूल अहमद यांनी सरकारी विभागाची मदत घेतली. त्यांनी लुथरा आणि शाहलीन यांना सहकार्य करण्यास सांगितले. लुथरा आणि शाहलीनने त्यांची मदत करण्याऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत.
[ad_2]