[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
तो इतकी दारू प्यायला होता की त्याला काही समजत नव्हते. तब्बल दोन दिवस हे महाशय या गटारात पडून होते आणि आज नशा उतरल्यानंतर बाहेर येण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत होते. हे पाहून येथील काहींनी समाजसेवकांना याबाबत कळविले अणि समाजसेवकांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून या दारुड्या महाशयाला सुरक्षित बाहेर काढले.
गटारातून बाहेर काढल्यावर तो दारूच्या नशेत असल्याचे ध्यानात आले. गेल्या दोन दिवसापासून गटारात राहिल्याने त्याचे कपडे आणि शरीर घाणीने बरबटून गेले होते. त्याला बाहेर काढून गटाराशेजारीच त्याला थंड पाण्याची आंघोळ घालण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात उपचारांसाठी पाठवून देण्यात आले.
तब्बल दोन दिवस हे महाशय दारूच्या नशेत तहानभूक विसरून गटारीत वास्तव्य करत होते. त्याची अधिक चौकशी केली असता हा तळीराम मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याचे समोर आले. शनिवारी पगाराचा दिवस होता. पगार झाल्यावर त्याने पगार झाल्याच्या खुशीत मद्यप्राशन केले आणि तो गटारातील पाइपात दोन दिवस मद्यधुंद अवस्थेत वास्तव्य करत होता.
दरम्यान या तळीरामाची चर्चा संपूर्ण बेळगावात सुरु असून दारुड्याला दारू पिण्यासाठी फक्त कारण लागते आणि नंतर तो काय करतो त्यालाच समजत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.
[ad_2]