400 year old vampire child found in grave,पायांना कुलूप, मान विचित्रपणे मोडलेली, ‘व्हॅम्पायर चाइल्ड’चा ४०० वर्ष जुना सांगाडा पाहून शास्त्रज्ञांना घाम फुटला – archaeologists found 400 year old vampire child skeleton in poland had lock on his leg

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

वॉर्सा: पोलंडमधील पुरातत्वशास्त्रज्ञांनी एक धक्कादायक शोध लावला आहे. त्यांना एका गावात ४०० वर्ष जुन्या लहान मुलाच्या सांगाड्याचे अवशेष सापडले आहेत. त्या मुलाला अत्यंत भयानक पद्धतीने पुरण्यात आले होते. त्याचे तोंड विचित्रपणे वळलेले होते. तसेच, त्या मुलाच्या पायाला लोखंडी कुलूप होते, जे खूप जड होते. जेव्हा पुरातत्वशास्त्रज्ञांनी हा सांगाडा पाहिला तेव्हा त्यांना आश्चर्ययाचा धक्काच बसला.

डेली मेल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, गावकऱ्यांनी या मुलाला ‘व्हॅम्पायर चाइल्ड’ म्हटले आहे. लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि मृत पिशाच कबरीतून उठू नये म्हणून या प्रकारे पुरण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचं त्यांनी सांगितले.

तोंड बंद केलं, नाकाच्या दोन्ही नाकपुड्या दाबल्या, शिंक थांबवण्याचा प्रयत्न अन् घसाच फाटला
निकोलस कोपर्निकस विद्यापीठाच्या पुरातत्व पथकाला पोलंडमधील पिएन गावात एका ठिकाणी मुलाचा सांगाडा सापडला. पुरातत्वशास्त्रज्ञांना त्याच ठिकाणी अशाच लहान मुलांचे सांगाडे आणि इतर ३० अवशेष आढळून आल्याने ते थक्क झाले. मानववंशशास्त्रज्ञांच्या मते या मुलाचे वय ५ ते ७ वर्षांच्या दरम्यान होते.

पुरातत्वशास्त्रज्ञांना हे अवशेष नेक्रोपोलिसमधील एका चिन्हांकित कबरमध्ये सापडले. हा शब्द ग्रीक भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ ‘मृतांचे शहर’ असा होतो. याच ठिकाणी गेल्या वर्षी एक ‘व्हॅम्पायर वुमन’ पुरलेली आढळली होती. ती पुन्हा कबरीतून बाहेर पडू नये म्हणून महिलेच्या पायाच्या पायाला कुलूप लावण्यात आले होते आणि तिच्या मानेवर विळाही सापडला होता.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

या ५ ते ७ वर्षांच्या मानल्या जाणाऱ्या मुलाच्या सांगाड्याच्या अवशेषांजवळ आणखी एक व्हॅम्पायर सापडला आहे. ती एक स्त्री होती जिला तिच्या मोठ्या पायाच्या बोटाला कुलूप बांधून आणि गळ्यात विळा घालून पुरण्यात आले होते. ‘व्हॅम्पायर महिला’ कबरीतून बाहेर पडू नये म्हणून असं करण्यात आल्याचं, सांगण्यात येतं.

फरशीखालून विचित्र आवाज, तोडून पाहिलं तर तीन भयकंर प्राणी निघाले, VIDEO पाहून धडकी भरेल

[ad_2]

Related posts