Shash Mahapurush Rajyog Shani Dev will make special Shash Mahapurush Yog good days will start for zodiac sign

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shash Mahapurush Rajyog : ज्योतिष शास्त्रानुसार, एका ठराविक वेळी एक ग्रह दुसऱ्या राशीतून प्रवेश करतात. हिंदू धर्मात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. ज्योतिष ग्रंथात शनिला कर्मकार, कर्मफल आणि न्यायाचा स्वामी मानलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रात, ग्रहांची स्थिती आणि गोचर यांना खूप महत्व दिलं जातं.

ज्योतिष्य शास्त्रानुसार, ज्यावेळी एखादा ग्रह मार्गी अवस्थेत जातो, त्यावेळी त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. शनी देव यांनी 17 जून रोजी कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनीदेव 4 नोव्हेंबरपर्यंत या स्थितीत राहणार आहेत. त्यानंतर ते मार्गी होणार आहेत. शनीची थेट चाल काही लोकांना चांगले परिणाम देणार आहेत. शनि मार्गी झाल्यावर शश राजयोग तयार होणार आहे. यामुळे काही लोकांच्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत. 

वृषभ रास

शनीच्या मार्गामुळे वृषभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. यावेळी शश राजयोग तुमचं नशीब उघडणार आहे. तसंच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात. तुम्ही करिअरमध्ये चांगली प्रगती कराल. तुम्हाला उच्च पद आणि मोठा पगार मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी शश राज योग फायदेशीर सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या जीवनात आनंद वाढणार आहे. पती-पत्नीचे नातं अधिक मजबूत होणार आहे. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होणार आहे. यापूर्वी असलेल्या वादग्रस्त प्रकरणात यश मिळणार आहे. तुम्हाला यावेळी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा मार्गी शुभ काळ आणणार आहे. कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. यावेळी शश राजयोग तयार होत असून या राशीच्या व्यक्तींना त्याचा फायदा होणार आहे. कुंभ राशीत शनीच्या संक्रमणाने स्थानिकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. या काळात वरिष्ठांशी चांगले संबंध होणार आहेत. तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts