Pakistan Zindabad Slogans In Pune On The Eve Of Independence Day

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पाकिस्तान जिंदाबादचे (pakistan) नारे दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. कोंढवा पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. दोन व्यक्ती या शाळा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे दोघे पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेले हे नारे ऐकले. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. 

दरम्यान झाल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कुठला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही केली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

तिरंग्याचाही अवमान…

स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी पुण्यात तिरंग्याचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पुण्यात म्युझिकल कॉन्सर्ट दरम्यान तिरंगा प्रेक्षकांमध्ये भिरकावला होता. पुण्यातील क्लबमध्ये गायिकेने नाचता नाचता थेट तिरंगा भिकावल्यानंतर थेट पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तिच्यावर कारवाई केली आहे. 

गायिका उमा शांती उर्फ शांती पीपल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. स्टेजवर डान्स करत असताना दोन्ही हातात तिरंगा घेऊन प्रेक्षकात फेकल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल झाले आहे. त्यानंतर हातवारे करून असभ्य वर्तन केल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. राष्ट्रध्वजाच्या आचारसंहितेचा भंग करून अवमान केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वीही दिल्या होत्या पाकिस्ताच्या घोषणा…

यापूर्वी पुण्यातील PFI संस्थेच्या तरुणांनी पुण्याीतील  PFI च्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी त्या तरुणांना आंदोलनाची परवानगी नसतानादेखील आंदोलन करुन त्यांनी मोठ मोठ्याने घोषणा दिल्याचं व्हिडीओमधून समोर आलं होतं. या प्रकरणावरुन राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. या तरुणांवर पोलिसांनी त्यावेळी कारवाईदेखील केली होती. 

कोंढव्यात नक्की चाललंय काय?

राज्यात सध्या ISISचे आरोपी पडकल्या जात आहे. पुण्यात ATS कडून दोन आरोपी पकडण्यात आले होते. त्यानंतर NIA कडून एका डॉक्टरला अटक करण्यात आली होती. हे सगळे कोंढवा परिसरात राहत होते. त्याच परिसरात आता दोन जणांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्यानं सुरक्षेचा प्रश्न उभा राहत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! स्वातंत्र्यदिनाचा पुणेकरांचा प्लॅन; झेंडावंदनानंतर थेट मेट्रोची सफर, पुणेकरांची मेट्रोत खचाखच गर्दी

[ad_2]

Related posts