Ketu Gochar 2023 will cause a big upheaval in the life these zodiac signs disruption in every work

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ketu Gochar 2023 : ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्यांच्या या परिस्थितीला गोचर म्हटलं जातंय. आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये केतू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं. हा ग्रह मानवी जीवनातील त्याग आणि अनास्थेचा कारक आहे. 

केतू ग्रह हा वृश्चिक आणि धनु राशीमध्ये उच्च मानला जातो. केतू सध्या तूळ राशीत असून लवकरच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय. दरम्यान केतूच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. दरम्यान यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हा कठीण काळ मानला जातोय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

वृषभ रास

केतूचं गोचर वृषभ राशींच्या लोकांसाठी फार कठीण ठरणार आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रेमप्रकरणात न पडण्याचा सल्ला देण्यात येतोय. या काळात तुम्हाला मित्रांकडून त्रास होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो विचार बाजूला ठेवा.  तुमच्या बोलण्यात कठोरपणा देखील येणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचं गोचर अडचणी निर्माण करणारं ठरणार आहे. यावेळी केतूच्या गोचरमुळे कुटुंबात मतभेद होऊ शकतात. कोर्ट केसमध्ये तुमचा पराभव होऊ शक्यता आहे. तुमचे पैसे अडकू शकतात. लपलेले शत्रू समोर येऊन नुकसान करू शकतात. या काळात, कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. खासकरून महिलांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. 

धनु रास

धनु राशीच्या दहाव्या भावात केतूचं गोचर होणार आहे. केतूच्या गोचरमुळे ऑफिसमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. घरगुती जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते, ही जबाबदारी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. कोणताही विचार न करता पैसे उधार देऊ नका. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts