इर्शाळवाडीतील रहिवाशांचे ६ महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

इर्शाळवाडी आपत्तीग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पाहणी केली. महिनाभरात दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इर्शाळवाडीतील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रहिवाशांना ६ महिन्यांत कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले.

स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी चार वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडीतील रहिवाशांसाठी तात्पुरती राहण्याची सोय असलेल्या ठिकाणी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माण व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी काही घरांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी करताना रहिवाशांशी संवाद साधला.

गेल्या महिन्यात 20 जुलै रोजी इर्शाळवाडीची घटना घडली होती. मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून येथे रहिवाशांची सोय करण्यात आली आहे. या नागरिकांना सुमारे 42 कंटेनरमध्ये ठेवण्यात आले आहे. याशिवाय रुग्णालय, अंगणवाडी, पोलीस नियंत्रण कक्ष, आपत्कालीन नियंत्रण कक्ष आदी सुविधा अन्य दहा कंटेनरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा

उंदरांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई पालिकेची योजना यशस्वी

नवी मुंबईतील ‘या’ दोन तलावांचे होणार सुशोभीकरण

[ad_2]

Related posts