Neymar Joins Saudi Club Al Hilal He Will Get Rs 900 Crore Salary Per Year with All the Luxury Facilities; २५ बेडरूमचे घर, प्रायव्हेट जेट, ९०० कोटी सॅलरी… उगीच नेमार सौदीला गेला नाही, सुविधा पाहून चक्करच येईल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने PSG ला अलविदा केले आहे. आता हा ३१ वर्षीय नेमार सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबकडून खेळणार आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस, क्रिस्टियानो रोनाल्डोने युरोपचा क्लब सोडून सौदी अरेबियाच्या क्लबशी करार केला. तेव्हापासून मोठी नावे सातत्याने सौदीकडे वळत आहेत. नेमारच्या आधी करीम बेंझेमा, साने, एन’गोलो कांटे ही मोठी नावेही युरोपमधून सौदी अरेबियात गेली आहेत.

नेमारचा पगार ९०० कोटी रुपये

अल हिलालकडून खेळताना नेमार जूनियरला १०० दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे ९०० कोटी रुपये दरवर्षी मिळतील. नेमारकडे पैशांसोबतच लोक ज्याचे स्वप्न पाहतात त्या सर्व लक्झरी असतील. नेमार ज्या घरात राहणार आहे त्या घरात २५ खोल्या असतील. त्याला तीन गाड्या मिळतील, ज्यांची एकूण किंमत १५ कोटींपेक्षा जास्त आहे.

अल हिलाल नेमारला काय काय देणार?

• १०० दशलक्ष युरो वार्षिक पगार
• २५ बेडरूमचे घर
• ४०x१० मीटरचा स्विमिंग पुल
• घरी काम करण्यासाठी ५ लोक
• बेंटले कॉन्टिनेंटल जीटी
• एस्टन मार्टिन डीबीएक्स
• लॅम्बोर्गिनी हुराकन
• २४ तास ड्राइव्हर
• हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि त्यांच्या सुट्टीच्या कालावधीतील विविध सेवांची सर्व बिले क्लबकडे पेमेंटसाठी पाठवली जातील
• प्रवासासाठी खाजगी विमान
• सोशल मीडियावर सौदी अरेबियाचा प्रचार करणाऱ्या प्रत्येक पोस्टसाठी ४.५ कोटी रुपये

फुटबॉलसाठी घर सोडलं, लोकांच्या घरची कामं केली अन् जगात नाव कमावलं; कोल्हापूरच्या कन्येची गगन भरारी

सौदीचा सर्वात यशस्वी क्लब अल हिलाल

अल हिलाल हा सौदी अरेबियातील सर्वात यशस्वी क्लब आहे. या क्लबने सौदी प्रो लीग ही तेथील प्रीमियर लीग, विक्रमी १८ वेळा जिंकली आहे. अल हिलालने किंग कप विक्रमी १० वेळा, क्राउन प्रिन्स कप विक्रमी १३ वेळा, सुपर कप विक्रमी ३ वेळा, फेडरेशन कप विक्रमी ७ वेळा जिंकला आहे. अल हिलालने ४ वेळा एशियन चॅम्पियन्स लीगचे विजेतेपदही जिंकले आहे.

[ad_2]

Related posts