80 Percent Candidates Lie About Salary In Their Resumes Physics Wallah HR Head Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PhysicsWallah : इंटरव्ह्यूकरता CV फार महत्वाचा आहे. तुमच्या CV वरुन तुम्हाला नोकरी मिळणार की नाही हे समजते. मात्र अशातच या CV विषयी मोठा खुलासा PhysicsWallah च्या HR यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, 80 टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार आपल्या CV मध्ये खोटी माहिती लिहितात. त्यामध्ये ते प्रामुख्याने मागच्या नोकरीविषयी आणि पगारबद्दल खोटे सांगतात. एखाद्या नोकरीच्या नियमावलीमध्ये बसण्याकरता हे उमेदवार खोटी माहिती सांगतात. 

पुढे त्यांनी सांगितले की, सध्या कंपनी एका टेक्नाॅलाॅजीवर काम करत आहे. ज्याद्वारे एखादा उमेदवार त्याच्या पगाराविषयी खरे बोलतो आहे की नाही हे कळू शकते. तसेच या तंत्रज्ञानाच्या मदतीने उमेदवाराच्या बँक खात्याची माहिती देखील तपासली जाऊ शकते. प्रत्येक वेळी मुलाखतीत दिलेली माहिती ही खरी नसू शकते. अर्जदार मुलाखतीमध्ये मागच्या कंपनीमध्ये केलेल्या कामाविषयी खोटी माहिती देऊ शकतात. अशा वेळी टेक्नाॅलाॅजीचा वापर महत्वपूर्ण ठरु शकतो. 

तसेच एडटेक कंपनीकडे एक पर्याय उपलब्ध आहे ज्याद्वारे HR कोणते लोक किती काम करत आहेत, कोण नोकरी सोडणार आहे हे समजते. हे सर्व करण्याकरता AI Boat उपयोगी पडू शकते. CHRO ने कर्मचार्‍यांच्या कामगिरीचे विश्लेषण करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर विशिष्‍ट माहिती दिली. सध्या कंपनी डार्विनबॉक्‍स नावाच्या प्रोग्रामचा वापर करत आहेत. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे रोजचे काम, परफाॅर्मन्स याचा अगदी बरोबर अंदाज येतो.  

कोण आहे फिजिक्स वाला? (Who is Physics Wallah)

भारतातील प्रसिद्ध यूट्यूबर आणि उद्योजक अलख पांडे यांना फिजिक्स वाला या नावाने देखील ओळखले जाते. आपल्या करिअरची सुरुवात त्यांनी फिजिक्स वाला या नावाने केली आणि हेच नाव पुढे एक ब्रँड बनले. वर्ष 2016 मध्ये जिओ नेटने बाजारामध्ये उडी घेतली आणि संपूर्ण भारतामध्ये Free 4G नेटवर्क आलोय ज्यामुळे प्रत्येक जण यूट्यूबवर मनोरंजक आणि एज्युकेशन घेऊ लागले. 2015 मध्ये स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरु केले सुरुवातीच्या दिवसात यूट्यूबवर त्यांना काही खास रिस्पॉन्स मिळाला नाही. मात्र 2017 मध्ये फिजिक्स वाला यांनी ऑफलाईन शिकवण्यास बंद केले आणि त्यांनी पूर्ण वेळ ऑनलाईन शिकवण्यास आणि यूट्यूब व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. आज फिजिक्स वाला हे नाव घराघरांमध्ये पोहोचले आहे आज त्यांचे यूट्यूब वर 9.75M सबस्क्राईबर्स आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Kalyan Crime: कल्याण पूर्वमधील तिसगाव परिसरात 12 वर्षांच्या मुलीची तरुणाकडून हत्या, आरोपी आदित्य कांबळे पोलिसांच्या ताब्यात

[ad_2]

Related posts