[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 52 दिवसांनी सुप्रिया सुळे (Supriya sule) या बारामतीत दाखल झाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे, पवार कुटुंब नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. राज्यातील राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत की अजित पवारांसोबत अशा चर्चा सुरू असताना बारामतीत मात्र अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्या सोबत दिसून आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तीनच दिवसांपूर्वी शरद पवारांकडे पाठ फिरवलेले अजित पवारांचे कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांच्या सोबत दिसले. या प्रकरणी सुप्रिया यांना विचारले असता त्यांनी हे कार्यकर्ते नसून पवार कुटुंबियांचा अविभाज्य घटक आहेत, असे सुळे यांनी म्हटले आहे.
त्या म्हणाल्या की, बारामती माझं माहेर आणि कर्मभूमी आहे. लोक माझ्या बरोबर आहेत. माझं समाजकारण आहे. मी पक्षाकडे फक्त तिकीट मागितले आहे. मी एक सेवक म्हणून लोकांनी मला संधी दिली. दिल्लीत संसदेत बारामतीची आण बाण शान पहिल्या नंबरला राहिल.
पक्षात विचारांचं अंतर…
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विचारांचे अंतर निर्माण झालं आहे. यांच्यात पवार कुटुंबियांचा काही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही. हा एक कौटुंबिक विषय नाही. आमच्यातल्या काही घटकाला असं वाटत की वेगळ्या विचारांच्या घटकसोबत त्यांनी जावे आणि काहींचे म्हणणं वेगळं आहे. हे वैयक्तिक मतभेद नाहीत तर वैचारिक आहे. यात गैर काही नाही.
अजित पवार लवकरच बारामतीत येतील…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज अंतर दिसत आहेत. पुढे काही होईल मी सांगू शकत नाही हे वैचारिक मतभेद आहेत मन भेद नाही. अजित पवार रोज महाराष्ट्रच्या दौऱ्यावर असतात ते लवकरच बारामतीत येतील. दिल्ली गेले पाऊस आहे त्यामुळे त्यात व्यस्त होते. आज माझी जी ओळख बारामतीमुळे आहे. माझं सगळं बारामतीत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
महागाई कधी कमी होणार?
आम्ही सरकारवर प्रेशर आणले आणि आता महागाई कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. इतक्या दिवस महागाई कमी करणे का सुचलं नाही? नक्की कितीने महागाई कमी होईल हे सांगता येत नाही. पण महागाई कमी झाली तर इंडियाने जे काम संसदेत केलं त्यामुळे ही महागाई कमी होईल, असं त्या म्हणाल्या
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pune Bhatghar Dam News : रिसॉर्टच्या चुकीच्या बांंधकामामुळे बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू; जलसंपदा विभागाकडून भोरचं सीमा रिसॉर्ट थेट पाडण्यात येणार?
[ad_2]