[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत गेल्याने जशी कार्यकर्त्यांची अडचण होत आहे तशी नेत्यांची देखील होत आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी (18 ऑगस्ट) इंदापूर (Indapur) तालुक्यात आला. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी जाहीर सभेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्यावर टीकेची झोड उमटवली. परंतु आपण आता भाजप सरकारसोबत असल्याचे लक्षात येताच दत्तात्रय भरणे यांनी सावरुन घेतले. “आता आम्ही तीन डब्यांच्या किंवा ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आहोत त्यामुळे मला बोलायला मर्यादा येतात असं दत्तात्रय भरणे म्हणाले.
सवयीप्रमाणे टीका करण्यास सुरुवात केली, सरकारसोबत असल्याचं लक्षात येताच सावरलं
इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात 20 कोटी 74 लाख रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी दत्तात्रय भरणे बोलत होते. नेहमीप्रमाणे दत्तात्रय भरणे यांनी भाषणाला सुरुवात केल्यानंतर सवयीप्रमाणे त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. हर्षवर्धन पाटील हे जातीचे राजकारण करतात तसेच निवडणूक संपली की पाच वर्षात तुमच्याकडे येतात का? अशी टीका भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली. परंतु काही वेळाने भरणेनी त्यांचं म्हणणं सावरुन घेत आम्ही तीन डब्यांच्या किंवा ट्रिपल इंजिन सरकारमध्ये आहोत त्यामुळे मला बोलायला मर्यादा येत आहेत. मला कुणावरही टीका करायची नाही. कुणाच्या कारखान्यावर बोलायचे नाही, अस म्हणून भरणे यांनी विषय सावरुन घेतला.
आधी मनसोक्त टीका आणि बोलताना बंधने
दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे इंदापुरातील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. याआधी दत्तात्रय भरणे मनसोक्त हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करायचे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर एक गट भाजप सोबत सत्तेत गेल्याने आमदारांना देखील बोलताना बंधने येऊ लागली आहेत. याचाच प्रत्यय काल इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात आला.
[ad_2]