Chaturgrahi Trigrahi Yoga will be lucky People of this zodiac will be rich

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chaturgrahi-Trigrahi Yog: वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्त्व असतं. ग्रहांच्या या राशीबदलामुळे चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग बनतात. हे दोन्ही योग वैदिक ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. 

गुरुवारी म्हणजेच 17 ऑगस्ट रोजी सूर्याने सिंह राशीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे बुध ग्रह आणि मंगळ ग्रह हे आधीच सिंह राशीत आहे. याशिवाय 18 ऑगस्टला चंद्रही सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत चार ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग तयार झाला आहे. तर ज्यावेळी तीन ग्रह कोणत्याही एका राशीत एकत्र येतात तेव्हा त्याला त्रिग्रही योग म्हणतात. सध्या सिंह राशीमध्ये मंगळ, शुक्र आणि बुध हे तिन्ही ग्रह एकत्र आहेत, त्यामुळे त्रिग्रही योगही तयार झाला आहे. दरम्यान चतुर्गही आणि त्रिग्रही हे दोन्ही योगाचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम होणार आहे. 

मिथुन रास

चतुर्ग्रही आणि त्रिग्रही योग या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. तृतीय घरात चतुर्ग्रही योग तयार झाल्याने आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरी व्यवसायासाठी वेळ अनुकूल आहे. या काळात नवीन संधी मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. त्रिग्रही योगातून आर्थिक लाभ होण्याची चांगली शक्यता आहे. तुम्ही केलेल्या जवळपास सर्व योजना यशस्वी होतील. नवीन नोकरीच्या ऑफर देखील येऊ शकतात. 

मेष रास

सिंह राशीत बनलेला त्रिग्रही योग राशीच्या लोकांसाठी खूप शुभ सिद्ध होणार आहे. या काळात तुम्हाला उच्च पद मिळू शकणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. नशीब मिळण्याची शक्यता आहे, कामात यश मिळेल. तर चतुर्ग्रही योगामुळे उत्पन्नात वाढ, पदोन्नती आणि अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

चतुर्ग्रही योग या राशीच्या व्यक्तींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. कामात यश मिळवून देणारा हा योग सिद्ध होईल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. सुख-सुविधांसोबत अमाप संपत्ती मिळू शकणार आहे. बरेच दिवस रखडलेले काम आता पूर्ण होऊ शकते. नशीब तुम्हाला त्रिग्रही योगाने साथ देणार आहे. काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी यशाचे संकेत आहेत. 

वृश्चिक रास

चतुर्ग्रही योग या राशीच्या व्यक्तींसाठी फलदायी सिद्ध होणार आहे. समाजात मान-सन्मान मिळणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या कामांची प्रशंसा होईल. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नशिबामुळे थांबलेली कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. दुसरीकडे त्रिग्रही योगाने धन लाभाचे चांगले योग तयार होत आहेत. ज्या लोकांचे कोणतेही कायदेशीर प्रकरण चालू आहे त्यांचा विजय होईल. 

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts