Raksha Bandhan 2023 : राखी बांधताना 3 गाठ का मारतात? यंदा भद्रामुळे कधी साजरा होणार रक्षाबंधन, काय सांगतात ज्योतिषशास्त्र पंडीत

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raksha Bandhan Three knots :  अधिक मास आल्यामुळे यंदा सगळे सणवार पुढे ढकल्या गेलं. निज श्रावण मासाला सुरुवात झाली असून नागपंचमीचा सण साजरा झाला आहे. आता प्रत्येकाला वेध लागले आहेत ते रक्षाबंधनाचे. पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्लातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. भावा बहिणीच्या प्रेमाता हा सण पंचांगानुसार 30 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे. यंदा रक्षाबंधनासंबंधात अनेक समज गैसमज आहेत. शिवाय राखी बांधताना 3 गाठ का मारतात अशा अनेक गोष्टींबद्दल ज्योतिषशास्त्र पंडित आनंद पिंपळकर यांनी मार्गदर्शन केलं आहे. (raksha bandhan 2023 why three knots while tying rakhi bhadra time rakhi shubh muhurt Raksha Bandhan Niyam and Gift)

राखी बांधताना 3 गाठ का मारतात?

बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधताना 3 गाठ मारल्या पाहिजे, याला धार्मिक महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, मनगटावर बांधलेल्या तीन गाठी देवाशी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंध आहे. 

प्रत्येक गाठ ही देवाला समर्पित असते.  राखीची पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी, दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ भाऊ-बहिणीच्या नात्यात गोडवा राहण्यासाठी असतो. 

रक्षाबंधनाला भद्रा योग आहे तर मग..?

रक्षाबंधनाला भद्रा योग असल्याने अनेकांना शंका आहे की रक्षाबंधन कधी साजरा करायचं याबद्दल गैरसमज आहेत. पंचांगानुसार 30 ऑगस्टला पौर्णिमा तिथी सकाळी 11.00 पासून सुरु होऊन 31 ऑगस्टला सकाळी 7.07 वाजेपर्यंत असणार आहे. यात 30 ऑगस्टला भद्रा सकाळी 10.59 ते रात्री 09.00 पर्यंत असणार आहे. 

असं म्हणतात भद्र योगात शुभ काम करायचं नसतं. मग भावाने बहिणीला कधी राखी बांधायची कुठला शुभ मुहूर्त आहे याबद्दल आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहे. भद्र पुच्छ काळात राखी बांधू शकता, असं पिंपळकर सांगतात. 

रक्षाबंधनाला ‘या’ गोष्टी टाळा!

रक्षाबंधनाला काही नियम पाळाते याबद्दलही आनंद पिंपळकर यांनी सांगितलं आहेत. 

कशा प्रकारच्या राख्या बांधणे टाळावे याबद्दल त्यांनी माहिती दिली आहे. त्याशिवाय रक्षाबंधनासंदर्भातील नियम, अटी, औक्षण करण्याचे नियम आणि कुठल्या वस्तू भेट म्हणून देऊ नयेत हेही सांगितलं आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts