[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
कसारा येथून प्रवास उत्तर भारतात, मराठवाड्यात आणि विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. कसारा स्थानकामध्ये सहा नव्या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.
कसारा स्थानकामध्ये २३ ऑगस्टपासून एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटणा एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसाराला जाण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध आहे. कसारा येथून नाशिक देखील जवळ आहे. त्यामुळं मध्य रेल्वेनं नव्यानं घेतलेल्या निर्ण्यामुळं कसारा स्थानकातून एलटीटी शालिमार एक्स्प्रेस मधून पूर्व भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
एलटीटी शालिमार एक्स्प्रेस ही महाराष्ट्रातून पुढे छत्तीसगड, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये जाते. याशिवाय बिहारची राजधानी पाटणा येथे जाणाऱ्या एक्स्प्रेसला देखील थांबा देण्यात आल्यानं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
याशिवाय मुंबईतून राज्याच्या मराठवाडा आणि विदर्भात जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस आणि राज्यराणी एक्स्प्रेसला देखील कसारा स्थानकात थांबा देण्यात आल्यानं या स्थानकाचं महत्त्व वाढणार आहे.
हेही वाचा
पश्चिम रेल्वेचा 24 ऑगस्टला पॉवर ब्लॉक, ‘या’ ट्रेन्स रद्द
दुरांतोसह ‘या’ १० मेल-एक्स्प्रेस गाड्यांना कल्याणमध्ये थांबा
[ad_2]