September Grah Gochar 2023 : सप्टेंबर महिन्यात 5 ग्रहांचं गोचर! ‘या’ राशींना धनलाभासह कुटुंबात नांदेल सुख

( प्रगत भारत । pragatbharat.com)

September Grah Gochar 2023 : प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदल असतो. सप्टेंबर महिन्यात 9 पैकी 5 ग्रह आपली स्थिती बदलणार आहेत. गुरु, शुक्र, बुध, सूर्य आणि मंगळ हे ग्रह भ्रमण करणार आहे. त्या पाच राशींचं गोचर सप्टेंबर महिना काही राशींच्या लोकांची आयुष्यात धनलाभ, करिअर आणि कौटुंबिक सुख घेऊन येणार आहे.  (september horoscope 2023 september planet changes Grah Gochar these 5 zodiac signs became lucky)

सप्टेंबर ग्रह गोचर (September Horoscope 2023 Grah Gochar )

4 सप्टेंबर 2023 –  शुक्र कर्क राशीत प्रवेश 
4 सप्टेंबर 2023 – गुरू मेष राशीत वक्री होणार
16 सप्टेंबर 2023 – बुध सिंह राशीत गोचर
17 सप्टेंबर 2023 – सूर्य कन्या राशीत गोचर
24 सप्टेंबर 2023 – मंगळ कन्या राशीत संक्रमण

मेष (September 2023 Aries horoscope )

सप्टेंबर महिन्यात हा या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभदायक ठरणार आहे. या लोकांना मान-सन्मान लाभ आहे. तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुमची लव्ह लाईफ देखील खूप चांगली होणार आहे. वैवाहिक जीवनात उत्साह आणि सहकार्य लाभणार आहे. मात्र कोणाशीही वाद घालू नका, नाही तर तुमचं नुकसान होईल. 

वृषभ (September 2023 Taurus horoscope)

सप्टेंबर महिन्यात या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसणार आहे. तुमच्या घरामध्ये आणि व्यवसायात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्यावर तुम्ही मात करणार आहात. आर्थिक बाबतीतही हा महिना खूप लकी ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे. 

सिंह (September 2023 Leo horoscope)

सप्टेंबर महिना या  राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फलदायी सिद्ध होणार आहे. या काळात तुमच्या रखडलेल्या कामांमध्ये प्रगती होणार आहे. तुमचं उत्पन्नाचं स्रोत मर्यादित असले तरी तुमच्या आर्थिक स्थितीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. या महिन्यात तुम्हाला अनेक वेळा बाहेर गावी जावं लागणार आहे. 

तूळ (September 2023 Libra horoscope)

सप्टेंबरमध्ये या राशीच्या लोकांना यश घेऊन आला आहे. पण, त्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला संयमाने वागावं लागणार आहे. यश मिळवण्यासाठी हितचिंतकांचे सहकार्य घ्यावं लागेल. या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 

वृश्चिक (September 2023 Scorpio horoscope)

या राशीचे या महिन्यात कामात खूप व्यस्त असणार आहेत. एवढंच नाही तर तुमची काही रखडलेली कामे मार्गी लागणार आहे. हा महिना तुमच्या कुटुंबात आनंद घेऊन येणार आहे. मात्र या महिन्यात तुमच्या राहणीमानावर खूप खर्च होणार आहे. 

 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts