[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Maharashtra Weather : सध्या राज्यात पावसानं (Rain)दडी मारली आहे. पावसाअभावी खरीपाची पिकं (Kharif crops) वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Mainkrao Khule) यांनी दिली आहे. पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजे 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकण आणि काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे. सप्टेंबर 7 नंतरच्या पावसाची स्थिती त्यावेळीच वातावरणातील बदलावर अवलंबून असेल असे खुळे म्हणाले. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतानाही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळं सध्या एल निनोचा मोठा प्रभावामुळं कमी पाऊस पडत आहे. 1 सप्टेंबरनंतर केव्हाही राजस्थानातून मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका ह्याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त, व चित्रा ह्या चार नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? असे खुळे म्हणाले. ज्याने तीन महिने साथ दिली नाही, त्याच्याकडून सप्टेंबरसहीत उर्वरित दिड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? असे खुळे म्हणाले.
खरीपाची पिके धोक्यात
केवळ पावसावरच अवलंबून असणाऱ्या खरीप हंगामातील सध्याची जिरायत उभी पिके माना टाकत आहेत. तर काही ठिकाणी पिके जळण्याच्या मार्गांवर आहेत. या पिकांना पाण्याची खूप गरज आहे. पिके वाचवण्यासाठी शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. काही ठिकाणी शेतकरी पिकांवर रोटवेटर मारण्याच्या मनस्थितीत आहेत. निसर्ग आहे, आणि काही तरी पाऊस होईलच, ह्या आशेवर, खरीपात हिरमोड झालेले शेतकरी पुन्हा रब्बी हंगामाचा ‘ श्री गणेशा ‘ करण्याच्या तयारीत आहेत. तेव्हा आता रब्बी हंगामातही अशा क्षेत्रात जपूनच पावले टाकावी लागतील असे खुळे म्हणाले. शेती निगडीत महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, साखर कारखानदारी, तसेच सिंचन विभाग यांनाही या पावसाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक नियोजनात गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते. कारण, सध्याची पावसाची वस्तुस्थिती झाकता येत नाही. मान्सूनचे सध्याचे सर्व वास्तव नाकारुन चालणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
Monsoon Update : कुठे ऊन, कुठे पाऊस; सध्या राज्यात मान्सूनची काय परिस्थिती? मान्सून परतणार कधी?
[ad_2]