Glass panels that fell on auto parked at borivali metro station to be replaced with suitable alternatives

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बोरिवली मेट्रो स्टेशन इमारतीच्या संरचनेतून काचेचे पॅनल एका रिक्षावर पडल्याचे समोर आले आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) इतर स्थानकांवरून अशाप्रकारचे काचेचे पॅनल हटवण्यास सुरुवात केली आहे.

एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “17 मेट्रो स्थानकांपैकी तीन स्टेशनमध्ये समान प्रकारचे पॅनेल आहेत, जे कंत्राटदारांच्या खर्चावर अधिक योग्य पर्यायांसह बदलले जातील.”

बोरिवलीतील मंडपेश्वर मेट्रो स्टेशनवर नवीन बनवलेल्या मेट्रो 2A मार्गावरील कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे यावरून दिसीन येते, असे नागरिकांनी नमूद केले आहे. मेट्रो स्थानकावरील काचेचे पॅनल खाली उभ्या असलेल्या ऑटोरिक्षावर पडले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, एमएमआरडीएने बेकायदा पार्किंगचा ठपका रिक्षाचालकावर ठेवला.

झोरू भाथेना या कार्यकर्त्याने सांगितले की, जबाबदार एजन्सीने या घटनेची जबाबदारी घेतली पाहिजे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. दरम्यान, वाहतूक कार्यकर्ते मोहम्मद अफझल यांनी सर्व मेट्रो स्थानकांच्या सेफ्टी ऑडिटच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की कोणतीही मेट्रो लाईन सुरू करण्यापूर्वी सुरक्षा अनुपालन प्रमाणपत्र ही एक अनिवार्य पूर्व शर्त आहे, अशा घटनांना सक्रिय प्रतिबंध करण्याची गरज आहे.


हेही वाचा



[ad_2]

Related posts