Pune Struggle Of Anand Kurapati Kbc Contestant From Pune Amitabh Bachhan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : हौसला बुलंद हो तो मंजिले दूर नही होती, हे वाक्य आपल्यातील  (Kaun Banega Crorepati ) अनेकांनी ऐकलं आहे. मात्र आनंद राजू कुरापती हा तरुण चक्क कौन बनेगा करोडपतीमध्ये हॉटसीटवर बसून हे वाक्य जगला आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत अभ्यास करुन थेट हॉट सीटवर बसून त्याने साडे बारा लाख रुपये जिंकले आहे. बच्चन आणि हॉट सीट सगळंच भारावून टाकणारं आहे, असं तो म्हणतो. त्याच्या आयुष्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून बिग बी अमिताभ बच्चन यांनीदेखील सॅल्यूट केला आहे. 

वडिलांचा पॅरालिसीस बरा करणार…

मुळचा सोलापूरचा असलेला आणि  पुण्यात शिक्षण घेत असलेला आनंद राजू कुरापती या तरुणाचा मासिक पगार फक्त 8-10 हजार आहे. मात्र पण कौन बनेगा करोडपतीमध्ये त्याने साडे बारा लाख  जिंकले. आपल्या ज्ञानाच्या बळावर शिकून स्वतःला सुसज्ज करण्याच्या त्याच्या जबरदस्त इच्छा शक्तीमुळेच हे शक्य होऊ शकलं. अत्यंत समर्पित आणि कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून आपल्या वडिलांचा पॅरालिसिस बरा करण्याचे आणि आपल्या कुटुंबाला गरीबीमधून बाहेर काढण्याचे आनंदचे पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. हेच स्वप्न आता तो पूर्ण करु शकणार आहे.

इंडियन स्टॅटिस्टिकल ऑफिसर होण्याचं स्वप्न…

सिम्बायोसिस पुणे  येथे शिकत असलेल्या आनंदला पुढे UPSC इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस / इंडियन स्टॅटिस्टिकल सर्व्हिस (UPSC IES / ISS) परीक्षा देऊन विविध सर्वेक्षणांमध्ये विशेष प्राविण्य मिळवून इंडियन स्टॅटिस्टिकल ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. आनंदच्या बालपणीच्या हलाखीचे वर्णन ऐकून चक्क अमिताभ बच्चन भारावून गेले. 

आई विडी कामगार…

आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने आनंदला लहानपणीच कुटुंबाची जबाबदारी घ्यावी लागली. शिवाय वडिलांची प्रकृती देखील ढासळत चालली होती. त्याची आई कुटुंबाच्या निर्वाहासाठी बिडी वळण्याचे काम करत असे. आनंदने शिवणकाम केलं. आठ रुपयात पॅंट शिवून द्यायचा. KBC मधून तो आयुष्यातला पहिला 3 लाख 20 हजार रुपयांचा चेक स्वतःसोबत घरी घेऊन गेला.
 
KBC मध्ये सहभागी होण्याबद्दल आणि चांगले यश मिळवण्याबद्दल आनंद म्हणतो, “माझ्या कुटुंबाला असा आनंद मिळाला आहे, जो त्यांनी आजवर कधीच अनुभवला नव्हता. कष्ट तर नेहमीच आमचे सोबती होते. बक्षिसाच्या रकमेचा मला माझ्या कुटुंबाला हातभार लावण्यास आणि माझ्या शिक्षणासाठी उपयोग होईल. माझी क्षमता दाखवण्याची ही संधी मला दिल्याबद्दल मी KBC चा ऋणी आहे.  बच्चन यांनी दाखवलेला दयाळूपणा आणि सहानुभूती माझ्यासाठी अनमोल आहेत. माझ्या माणसांना माझा अभिमान वाटावा अशी कामगिरी माझ्या हातून घडावी हीच माझी इच्छा आहे.

 

 

 


इतर महत्वाची बातमी-

Alia Bhatt : सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने आलिया भट्टचा आनंद गगनात मावेना; पोस्ट शेअर करत म्हणाली…

 

 

 

 

 

 

 

 



[ad_2]

Related posts