Maharashtra News Nashik News Protest Against Rahul Gandhi Over Congress Viral Video

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik BJP Protest : काँग्रेस पक्षाच्या (Congress) सोशल मीडिया हॅण्डलवरून एका व्हिडिओ प्रसाराची (Viral Video) करण्यात आला असून या व्हिडीओवरून राजकारण तापले आहे. राज्यभरात याचे पडसाद उमटत असून आता नाशिक (Nashik) शहरातील भाजप पक्षाने देखील तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. आज सकाळी रविवार कारंजा परिसरात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे राहुल गांधी यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले. 

अलीकडेच कर्नाटक निवडणुकीतील काँग्रेसचा विजयानंतर काँग्रेसवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. अशातच राहुल गांधी यांनी ट्रकद्वारे प्रवास करत चालकांच्या समस्या जाणून घेतल्या. याच दरम्यान काँग्रेस पक्षाने (Congress) त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलरवर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींच्या एका रॅलीचा हा व्हिडिओ असून ते जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. तसेच या व्हिडीओसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) शौर्यगाथेवरील गाणं बॅकग्राउंड म्युजिक म्हणून वापरण्यात आले आहे. आणि याच मुद्द्यावरून भाजपने (BJP) या व्हीडिओवर आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ तत्काळ डिलीट करून काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणीही भाजपने केली आहे. 

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पेजवरून व्हिडिओ प्रसारित केल्यानंतर राहुल गांधीची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. दरम्यान ‘एक-एक करून सगळे गड जिंकायचेत. सगळ्या दुश्मनांशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचे आहे’, असं कॅप्शनही या व्हीडिओला देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसपक्ष आणि राहुल गांधीचा निषेध करण्यासाठी रविवार कारंजा परिसरात भाजपा आणि युवा मोर्चाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकानी कपाळावर काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे. संबंधित व्हीडिओ डिलीट करावा, अशी मागणी भाजप पक्षाने केली आहे. तसेच कॉंग्रेसने जाहीर माफी मागावी, असेही भाजपने म्हटले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यावरही टीका करण्यात आली आहे.

नाना पटोले काय म्हणाले? 

भाजपच्या या आरोपांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन चालणं जर भाजपच्या दृष्टीने योग्य नसेल. तर काँग्रेस पक्ष शिवरायांचा विचार महाराष्ट्रासह देशात रुजवण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला आहे, असं नाना पटोले म्हणाले. राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही नाना पटोले यांनी टीका केली आहे. काळी टोपी घातलेली भगतसिंग कोश्यारी नावाची व्यक्ती शिवरायांबद्दल जे बोलली ते भाजपला मान्य आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.

[ad_2]

Related posts