NCP Leader Eknath Khadse Will Contest Lok Sabha Elections 2024 From India Alliance Sharad Pawar Jayant Patil

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Eknath Khadse on Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांन लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढवण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर लोकसभा मतदारसंघातून (Raver Lok Sabha Constituency) निवडणूक (Election Updates) लढवणार असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघातून सध्या खडसे यांची सून रक्षा खडसे (Raksha Khadse) या खासदार आहेत. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निडवणुकीत सून विरुद्ध सासरे अशी लढत होऊ शकते. दरम्यान, 5 तारखेला झालेल्या जळगावच्या (Jalgaon News) सभेत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खडसेंना लोकसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.     

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे म्हणाले की, “काँग्रेस (Congress) गेल्या अनेक वर्षांपासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. काँग्रेस 1990 पासून रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. सुमारे 10 निवडणुकांनंतर काँग्रेस ही जागा लढवत आहे. तेरा महिन्यांत एक निवडणूक वगळली तर काँग्रेसला येथे यश मिळालं नसतं, असे कार्यकर्त्यांचं मत आहे. काँग्रेसनं ही जागा 9 वेळा गमावली असती. ही जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून घेऊन येथे आपला उमेदवार उभा करू.”, असंही एकनाथ खडसे म्हणाले आहेत. तसेच, अखेर इंडिया आघाडीनं घेतलेला निर्णय सर्वांना मान्य करावा लागणार आहे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Eknath Khadse : पक्षाने आदेश दिल्यास रावेरमधून लोकसभा निवडणूक लढवणार

जयंत पाटील काय म्हणाले होते? 

“आता या जिल्ह्यातून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोण? हा प्रश्न आमच्या सर्वांच्याच मनात आहे. नाथाभाऊ हे शिवधनुष्य तुम्हीच उचललं पाहिजे, असं आम्हा सर्वांना वाटत आहे. तुम्ही 25 ते 30 वर्ष दोन-दोन खासदार निवडून दिलेले आहेत. त्यामुळेच शरद पवारांची अशी अपेक्षा आहे. हा जिल्हा 1985 साली शरद पवारांच्या मागे सातच्या सात आमदार निवडून देऊन 100 टक्के रिझल्ट या जिल्ह्यानं दिला आहे. ही या जिल्ह्याची परंपरा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, उद्याच्या राजकारणात तुम्ही या जिल्ह्यात लोकसभेत निश्चित शिवधनुष्य उचललं पाहिजे.”, असं जयंत पाटील म्हणाले होते. 

पाहा व्हिडीओ : नाथाभाऊ तुम्ही लोकसभेचं शिवधनुष्य उचललं पाहिजे : जयंत पाटील

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार? शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A. आघाडीच्या कोऑर्डिनेशन कमिटीची पहिली बैठक आज

[ad_2]

Related posts