Pune Helmet Day Pune Traffic Police Action Against Bikers Who Riding Without Helmet

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Helmet day :  रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी आणि रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी आजपासून सलग तीन दिवस पुण्यात हेल्मेट जनजागृतीची मोहीम राबविण्यात येणार आहे. पुण्यातील शासकीय कार्यालयात हेल्मेट जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पुण्यातील अनेक शासकीय कार्यलयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. शासकीय कर्मचारी हेल्मेट वापरत नसल्याचं आढळल्यास त्यांच्यावर  कारवाई करण्यात येत आहे. मात्र कर्मचारीदेखील पुणेकरच. त्यामुळे त्यांनी पोलिसांसमोरच हेल्मेट न घातल्याची वेगवेगळी भन्नाट कारणं सांगितली आहेत. 

यापूर्वी, वाहतूक पोलीस मोटारसायकलस्वारांना चौकाचौकात थांबवायचं आणि रस्त्यावर उभे राहून हेल्मेट वापरण्याची अंमलबजावणी करायचे. मात्र, पुण्यातील विरोधामुळे या भागातील अंमलबजावणीची कारवाई रखडली आहे. सध्या हेल्मेटची अंमलबजावणी प्रामुख्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून केली जाते.हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज (24 मे रोजी) पुण्यात “लाक्षणिक हेल्मेट दिन” साजरा केला जात आहे. याशिवाय, शहरातील प्रमुख शासकीय कार्यालयांसमोर हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई केली जात आहे.

कोणती कारणं दिली?

  • रोज हेल्मेट घालतो आज विसरलो.
  • घरातून निघायला उशीर झाला.
  • महिनाअखेर असल्याने हेल्मेट घेण्यास तेवढे पैसे देखील नाही, आता पेमेंट झाले की हेल्मेट घेणार आहे.
  • कार्यालयातून हेल्मेट चोरी गेलं. 
  • हेल्मेट घातल्याने मान दुखते म्हणून हेल्मेट घालत नाही.

शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन

दुचाकीस्वारांमुळे वारंवार अपघात होत असल्याने हेल्मेटच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्यासाठी 24 मे रोजी “लाक्षणिक हेल्मेट दिन” साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी केले होते. त्यात सुरुवातीला सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. सुरुवातीला जनजागृती करणे आणि सरकारी कार्यालयात येणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्यास प्रोत्साहित करणे यावर भर दिला जाईल. हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारांवरही कडक कारवाई केली जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.  हा उपक्रम सुलभ करण्यासाठी, विद्यमान वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कार्यालयांच्या आजूबाजूच्या भागात नियुक्त करण्यात आले आहे.

‘या’ सगळ्यांना हेल्मेट परिधान करणं बंधनकारक

दुचाकीचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, सर्व शाळा, कॉलेज व शासकीय यंत्रणा यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना शासकीय कार्यालयात येताना जाताना हेल्मेट परिधान करणे बंधनकारक आहे. 

हेल्मेटमुळे 80 टक्के संरक्षण

भारतात दररोज सुमारे 411 भारतीयांचा रस्ते अपघातांमध्ये बळी जातो. वाहन अपघातात दगावणाच्या व्यक्तींमध्ये सुमारे 80  टक्के लोक या दुचाकी वाहन चालक, पादचारी आणि सायकलस्वार असतात. हेल्मेटमुळे दुचाकीचा अपघात घडल्यास जीव वाचण्याची शक्यता 80  टक्क्याने वाढते. मोटार वाहन कायद्यानुसार 4 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीने दुचाकीवरुन प्रवास करतांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे.

[ad_2]

Related posts