daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 29 August 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Horoscope 29 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी व्यवसायात कोणताही नवीन निर्णय घ्यायचा असेल तर विचारपूर्वक घ्या. तुमची आर्थिक परिस्थिती खूप मजबूत असेल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहा. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी तुमच्या मित्रांवर जास्त विश्वास ठेवू नका. भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तोही थोडा विचार करून करा. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची पूर्ण साथ मिळेल. कोणतेही नवीन काम सुरू केले तर घरातील मोठ्यांच्या सल्ल्याशिवाय करू नका. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी तुमच्या जवळच्या मित्राकडून फसवणूक होऊ शकते. आज कोणताही मोठा पैशांचा व्यवहार करू नका, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. 

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी पैशांशी संबंधित सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. 

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या जवळच्या व्यक्तीला भेटू शकता, ज्याला पाहून तुम्ही आनंदी व्हाल. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी तुमच्या कुटुंबात काही वाद सुरु असेल तर तो दूर करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील.

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी कुटुंबातील सदस्यांच्या वागणुकीमुळे तुम्हाला खूप आदर मिळेल. नोकरदार लोकांना तुमच्या नोकरीत फायदा होईल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे वाहन वापरणे टाळावे अन्यथा अपघात होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू केल्याने तुम्हाला फायदा होईल.

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील.

मीन (Pisces)

आजच्या दिवशी तुमच्या वैवाहिक जीवनात शांतता राहील. पैशांच्या जास्त खर्चामुळे तुमच्यावर ताणही येऊ शकतो.

( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Related posts