Khashaba Jadhav Birthday Will Be Celebrated As State Sports Day Chief Minister Eknath Shinde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार, अशी घोषणा  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात केली. त्याशिवाय शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या रकमेतही वाढ करण्यात आली. जीवनगौरव पुरस्कारासाठी पाच लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी तीन लाख रुपये देणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन वर्षांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू स्व.खाशाबा जाधव यांचा जन्मदिन (15 जानेवारी) हा दिवस महाराष्ट्राचा राज्य क्रीडा दिन म्हणून घोषित केला. त्याशिवाय पुरस्कारांच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. आजच्या पुरस्कारार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा नितांत आदर राज्य सरकारला आहे. त्यांच्या कार्यातून इतर खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे सांगून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये आणि अन्य पुरस्कार विजेत्यांना तीन लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.  

ऑलिम्पिकमध्ये यश मिळावे यासाठी खेळाडूंना सर्व सहकार्य- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र खेळाला प्रोत्साहन देणारे देशतील अग्रेसर राज्य आहे. त्यामुळे खेळात महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले आहे. चौथ्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत 56 सुवर्ण पदकांसह एकूण 161 पदके मिळवून तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 39 पदकांसह 140 पदके मिळवून अव्वल कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेतही आपल्या खेळाडूंनी यश मिळवले. ऑलिम्पिकमध्येही चांगले यश मिळावे यासाठी सर्व सहकार्य करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. एकूण 119 खेळाडू आणि प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. श्रीकांत शरदचंद्र वाड यांना सन २०१९-२० या वर्षाचा तर दिलीप बळवंत वेंगसरकर यांना सन २०२०-२१ या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

[ad_2]

Related posts