Sadashiv Kumkar A Farmer Of Bramhanghar Village In Pune Bhor Taluka Cow Funeral Procession

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भोर, पुणे : शेतकरी आणि त्यांच्या घरात असलेल्या गाई, बैल आणि म्हशींशी वेगळं नातं असतं. हे सगळे प्राणी शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनतात. याचपैकी एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाला तर त्याचा परिणाम सगळ्या कुटुंबियांवर होतो. अशाच पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्राम्हणघर गावातील शेतकरी सदाशिव कुमकर यांच्या गायीचा मृत्यू झाला आणि त्यांनी पोटच्या पोरा प्रमाणे सांभाळलेल्या गाईची, घरातील सदस्याप्रमाणे अंत्ययात्रा काढली. लाडाने वाढवलेली गाय गेल्यावर तिच्या अंगावर वस्त्र टाकून, तिची बैलगाडीतून अंत्ययात्रा काढून शेतकऱ्यांनी कृतज्ञता दाखवली. 

बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत गावातील गावकरीही अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले होते. कुमकर कुटुंबीयांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या गायीला अखेरचा निरोप दिला. शेतकऱ्याचं हे गाईवरचं प्रेम पाहून गावातील नागरीक देखील भारावून गेले होते. भोर तालुक्यातील महुडे परिसरातील ब्राम्हणघर येथील शेतकऱ्याने गाईची अंत्ययात्रा काढून शेतकऱ्याच्या जीवनात आणि हिंदू धर्मात असलेलं गाईचे महत्व अधोरेखित केलं आहे. हिंदू धर्मात आज ही गोमातेला देवा समान मानलं जातं. आजही गोमातेची पूजा करण्याची प्रथा आहे. कुमकर या शेतकऱ्याने गोमातेला जीव लावून लहान बाळाला जसे सांभाळ करतो तसा तिचा सांभाळ केला होता.
 
कुटुंबियांनी चौदा ते पंधरा वर्षांच्या गायीचा मृत्यू झाल्यावर शेतकऱ्याच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. गाय गेल्यावर तिला कुठे तरी रानात टाकून दिलं जातं. परंतु तसं न करता या शेतकऱ्याने  तिच्या अंगावर वस्त्र टाकून तिची अंत्ययात्रा बैलगाडीतून काढली. बैलगाडीच्या पुढे भजन म्हणत ग्रामस्थ चालले होते. गावातून गाईची अंत्ययात्रा काढून तिचे पावित्र्य जपले गेले असल्याचे दृश्य ब्राम्हणघर येथे पहायला मिळाले. गाईची घरातील सदस्या प्रमाणे अंत्ययात्रा काढून शेतात गाईला पुरण्यातदेखील आलं.

गायीच्या शरिरात 33 कोटी देव असतात असं मानलं जातं. मात्र शेतकऱ्यांसाठी गाय ही कुटुंबातील अविभाज्य भाग असते. घरातील पाळीव प्राणी शेतकऱ्याचा जगण्याचा आधार असतो. याच गायीचा मृत्यू झाल्याने  कुमकर कुटुंबियांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. गायीनं दिलेला आशिर्वाद सार्थ ठरवण्याचा कुमकर कुटुंबियांनी पुरेपूर प्रयत्न केला. कृतज्ञता बाळगून गायीची अंतय़ात्रा काढली. 

गावकऱ्यांकडून कौतुक…

कुमकर कुटुंबातील गायीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी काढलेल्या या अंतयात्रेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. गावकऱ्यांकडून या कुटुंबियांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात आहे. गावातील इतर शेतकरी या कुटुंबियांचा  आदर्श घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

[ad_2]

Related posts