Allocation of 2521 houses for mill workers

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात गिरणी कामगारांसाठीच्या तब्बल 2521 घरांची सोडत जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार रायचूर, रायगड, रांजगोळी या भागांमध्ये असणाऱ्या घरांचा या सोडतीमध्ये समावेश असणार आहे. 

एमएमआरडीएकडून गिरणी कामगारांसाठी म्हाडाला मिळणाऱ्या या हजारो घरांची सोडत येत्या काळात जाहीर होणार आहे. जवळपास 58 कापड गिरण्यांच्या जागेवरील घरांसाठी जवळपास 1 लाख 74 हजार कामगार आणि वाससदारांनी अर्ज केले होते. त्यापैकी 10 हजार 701 गिरणी कामगारांना आतापर्यंत घरं मिळाली आहेत.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बॉम्बेडाईंग आणि श्रीनिवास मिलमधील 500 पात्र गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना घराच्या चाव्याही देण्यात येणार आहेत. 

सद्यस्थितीला रांजगोळी येथे असणाऱ्या घरांती दुरूस्तीकामं हाती घेण्यात आली असून, येत्या तीन महिन्यांमध्ये ही कामं पूर्णत्वास जातील आणि त्यानंतर गिरणी कामगारांनाच केंद्रस्थानी ठेवक म्हाडा आणि कामगार विभाग अर्ज छाननी आणि पात्र अर्जांची यादी तयार करण्यावर भर देतील.

प्राथमिक स्तरावर उपलब्ध घरं गिरणी कामगारांना पुरवली जात असतानाच काही कामगारांच्या मागणीनुसार त्यांना पश्चिम महाराष्ट्रातही घरं उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन विचाराधीन असल्याचं संबंधित यंत्रणांमधील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. 


हेही वाचा

[ad_2]

Related posts