[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : कसबा मतदार संघ (Kasba Constituency) आणि पर्वती मतदार (Parvati constituency) संघाच्या निधीवरुन आता कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजप नेते हेमंत रासने (Hemant Rasne) हे एकमेकांवर शाब्दिक वार करताना दिसत आहे. कसब्याचा निधी पर्वती मतदार संघाला दिल्याचा आरोप धंगेकरांनी केला होता त्यावर हेमंत रासनेंनी धंगेकरांना सडेतोड उत्तर दिलं आहे. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे आरोप अपुऱ्या माहितीच्या आधारे आहेत. जिल्हा नियोजन आणि नगरविकास विभागाच्या कामांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यावी, आणि मगच आरोप करावेत, असा टोला लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते धंगेकर?
कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. कसबा मतदार संघातील मूलभूत सोयी-सुविधा व विकासकामांसाठी उपलब्ध झालेला निधी, अचानकपणे पर्वती मतदार संघातील कामांकरिता वळवण्याचा धक्कादायक प्रकार झाला असून, निविदा प्रक्रियेपर्यंत आलेला निधी ऐनवेळी दुसऱ्या मतदारसंघाला देणे कसब्याच्या नागरिकांवर अन्याय करणारे आहे, ते म्हणाले होते.
“अपुऱ्या महितीच्या आधारे करणं आरोप चुकीचं”
त्याला उत्तर देताना हेमंत रासने म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना समान न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. कोणावरही अन्याय करण्याची त्यांची भूमिका नसते. जिल्हा नियोजन मधून सन 2022-23 मध्ये लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याप्रमाणे निधीचे वाटप झाले आहे. त्यामुळे अपुऱ्या माहितीच्या आधारे आरोप करणे पूर्णपणे चुकीचे आहे.
सर्व कामाचं श्रेय लाटण्याचा धंगेकरांचा प्रयत्न; रासनेंचा आरोप
ते म्हणाले की, धंगेकर यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. जिल्हा नियोजन आणि महापालिकेच्या माध्यमातून नगरविकासकडून करण्यात येणाऱ्या कामांचा कोणताही संबंध नाही. कसबा मतदारसंघ हा शहरी मतदारसंघ आहे. त्यामुळे इथली बहुतांश कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिका करते. दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी आपल्या कार्यकाळात जी कामे दिली होती. त्या कामाचा निधी मंजूर झाला होता. त्यांच्या पश्चात पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर निवडून आल्यानंतर त्यांनीही त्यांचीच कामे आपल्या नावाने दाखवून श्रेय लाटण्याचा प्रकार धंगेकर करत आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
इतर महत्वाची बातमी-
[ad_2]