Pune News Prostitution Of Bangladeshi Women In Budhwar Peth 19 People Arrested

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात बांगलादेशी (Bangladesh) नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक परिसरात अनेक बांगलादेशी नागरिक राहत असल्याचं समोर आलं होतं. त्यातच आता पुणे पोलीस बांगलादेशी नागरिकांबाबतीत अॅक्टिव्ह मोडवर आल्याचं बघायला मिळालं आहे.  अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. गुरुवारी रात्री विशेष मोहिमेंतर्गत 19 बांगलादेशींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. यात 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बुधवार पेठ परिसरात हे बांगलादेशी लोक राहत होते. यातील 10 महिला बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करत होत्या तर पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. ही कारवाई पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून करण्यात आली आहे. बुधवार पेठेतील सागर नावाच्या इमारतीतून या 19 जणांना ताब्यात घेतलं आहे. या 19 जणांकडे कोणतीही वैध कागदपत्रे नाहीत. तसेच भारत बांगलादेशी सीमेवरुन अनधिकृत भारतात प्रवेश केल्याचं देखीस समोर आलं आहे. 1 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला बुधवार पेठेत बांगलादेशातील लोक राहत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर 31 दिवसांनी पुणे पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. तीन महिन्यांपासून हे बांगलादेशी नागरिक बुधवार पेठेत राहत असल्याचं देखील समोर आलं आहे. 19 जणांवरही संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून (Survey of State Intelligence Agencies) एक धक्कादायक माहिती समोर आली होती. मागील काही वर्षात पुण्यात पाच हजार बांगलादेशी नागरिक वाढले असून इतरही जिल्ह्यात ही संख्या वाढल्याचं बोललं जातं आहे. पोलिसांकडून (Pune Police) बांगलादेशींवर कारवाई होताना दिसत नसल्याने घुसखोरांचे फावल्याचं दिसत होतं. त्यामुळे बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला होता.  

पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं…

दरम्यान पोलिसांना विशेष शोध मोहीम राबवण्याचे आदेश असून त्याअंतर्गत बांगलादेशी घुसखोर शोधणे, त्याची ओळख पटवणे तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करणे, त्यांचे अजून कोणी साथीदार आहेत का? त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? या सर्वांचा तपास करणे अशा कामांना वेळ लागत असल्याने पोलिसांकडून या कारवाईकडे डोळेझाक केली जाते आहे का? असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्रातील विविध भागात धार्मिक तेढ निर्माण होण्याच्या घटना या घडत असतानाच बांगलादेशी घुसखोरांमुळे आगामी काळात पुन्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर उदभवणार नाही ना? याकडेही पोलिसांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

इतर महत्वाच्या बातमी-

Mumbai Pune express Highway : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ITMS प्रणालीच्या कामासाठी उद्या दोन तासांचा ब्लॉक

[ad_2]

Related posts