Moon Earthquake Facts Know How Moon Land Feel Earthquake And Reason Of Tremors On Moon Check Here All Details

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Moonquake Facts: चांद्रयान चंद्रावर लाँच झाल्यापासून भारताचं प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत आहे आणि तेथून सतत विविध माहिती देत ​​आहे. प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या तापमानापासून ते चंद्रावरील अनेक खास गोष्टींची माहिती इस्रोसोबत शेअर केली आहे. आता प्रज्ञानने चंद्राच्या (Moon) पृष्ठभागावर भूकंप झाल्याची बातमी देखील इस्रोशी शेअर केली आहे, त्यानंतर वैज्ञानिकांकडून त्यावर संशोधन सुरु झालं आहे. पृथ्वीवरील भूकंपांबद्दल तर तुम्ही बरंच काही ऐकलं असेल आणि पृथ्वीवर भूकंप कसा होतो हे देखील तुम्ही पाहिलं असेल. परंतु चंद्रावर होणारा भूकंप पृथ्वीपेक्षा किती वेगळा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? यासोबतच या भूकंपाचं कारण काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.

पृथ्वीशिवाय चंद्र आणि इतर ग्रहांवर भूकंप कसे होतात? तिथे भूकंप येण्यामागचं नेमकं कारण काय आहे? हे जाणून घेऊया.

चंद्रावर भूकंप कशामुळे येतो?

वास्तविक, चंद्रावर होणाऱ्या भूकंपाला चंद्रकंप (Moonquake) म्हणतात, तर मंगळावर होणाऱ्या भूकंपाला मार्सक्वेक (Marsquake) म्हणतात आणि शुक्रावर होणाऱ्या भूकंपाला व्हीनस क्वेक (Venusquake) म्हणतात. मात्र चंद्रावर भूकंप होण्यामागचं कोणतंही विशिष्ट कारण आतापर्यंत समोर आलेलं नाही. यामागचं एक कारण असं मानलं जातं की, पृथ्वीप्रमाणेच चंद्राच्या पृष्ठभागावरील काही प्लेट्सचा असमतोल किंवा प्लेट्सची टक्कर झाल्यामुळे भूकंप होऊ शकतो.

याशिवाय चंद्राची एखाद्या उल्केशी टक्कर झाल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे देखील भूकंप येऊ शकतो, असंही सांगितलं जातं. चांद्रयानाने चंद्रावरील भूकंपाची माहिती देणं ही एक विशेष बाब मानली जात आहे. प्रज्ञान रोव्हरला चंद्रावर विशेष कंपन जाणवलं होतं.

प्रज्ञान रोव्हरने शेअर केला भूकंपाचा फोटो

चांद्रयान-3 च्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपाच्या धक्क्यांचा फोटो शेअर केला आहे. चंद्रावरील भूकंप जास्त खोलीवर होतात आणि ते 600 किमी ते 1000 किलोमीटर इतके खोल असतात. सोप्या शब्दात बोलायचं झालं तर, जेव्हा वेगवान प्लेट्स चंद्राला आदळतात तेव्हा चंद्राच्या आतील भागात भूकंपाच्या लहरी निर्माण होतात. याशिवाय चंद्रावर ज्वालामुखीचं अस्तित्व असेल तर देखील भूकंप होऊ शकतो.

लोक चंद्रावर करत आहेत जमीन खरेदी

भारताने चंद्रावर चांद्रयान 3 उतरवल्यापासून भारतीय लोकांमध्ये चंद्राविषयीची क्रेझ वाढली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण देशाला सुखद धक्का बसला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ही अवघड कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आणि जगभरातून भारताचं कौतुक झालं. आता या क्षणानंतर अनेकांनी चंद्रावर जमीन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा:

Chandrayaan 3: चंद्रावर जमीन खरेदीला सुरुवात! एका एकरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे; नेमकी प्रक्रिया काय?

[ad_2]

Related posts