ISRO mission Aditya L1 will launch today from sriharikota live updates detail marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Aditya L1 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थताच इस्रोची सूर्य मोहीम ही शनिवार (2 सप्टेंबर) रोजी अवकाशात झेपावणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्रोकडून तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दहा दिवसांपासून म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवून भारताने इतिहास रचला होता. तसचे चांद्रयान मोहीम अजूनही कार्यरत आहे. चांद्रयान-3 च्या लाँचिंगनंतर जवळपास 50 दिवसांनंतर इस्रोच्या मिशन आदित्यचे लाँचिंग करण्यात येणार आहे. आदित्य एल 1 हे यान सूर्याच्या कक्षेत राहून सूर्याचा अभ्यास करणार आहे. 

चांद्रयानाचं कौतुक पूर्ण होत नाही तोवरच इस्रो आणखी एक इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताची ही पहिलीच सूर्य मोहीम असून सूर्याचा अभ्यास आता इस्रो करणार आहे. आदित्य एल1 हे सूर्याच्या वातावरणचा अभ्यास करेल. तसेच याद्वारे सूर्याच्या बाह्य थराची देखील माहिती मिळवली जाणार आहे. हे यान जवळपास 15 लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. 

ज्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्तीचा समतोल साधला जातो त्या ठिकाणी हे यान काम करेल. म्हणजेच आदित्य एल1 हे लॅग्रेंज पॉईंट 1 वरुन सूर्याचा अभ्यास करणार आहे. तसेच या पॉईंटवरुन सूर्यग्रहणाचा किंवा सूर्यावरील कोणत्याही हालचालींचा परिणाम उपग्रहावर होणार नाही. ज्या ठिकाणी हे यान उतरवण्यात येईल त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षाणाचा प्रभाव जाणवणार नाही. जेणेकरुन सूर्याच्या किंवा पृथ्वीच्या दिशेने पुन्हा हे यान खेचले जाणार नाही. भारताचं मिशन आदित्य हे सूर्याची अनेक रहस्य उलगडण्यसाठी इस्रोला मदत करणार आहे. 

या लाँचिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये PSLV हे रॉकेट लाँच केले जाईल. पीएसएलव्हीच्या साहाय्याने या यानाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेमध्ये जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये आदित्य एल1 हे पृथ्वीची कक्षा हळूहळू पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेतून हे यान बाहेर काढले जाईल. तिसऱ्या टप्प्यामध्ये हे यान पृथ्वीच्या गरुत्वाकर्षणच्या प्रभावातून बाहेर काढले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात आदित्य एल1 हे त्याच्या जागी स्थापित केले जाईल. 

या संपूर्ण प्रक्रियेसाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागणार आहे. म्हणजेच हे यान त्याच्या जागी जाण्यासाठी त्याला चार महिन्यांचा प्रवास करावा लागेल. भारताच्या या महत्त्वकांक्षी मोहिमेकडे आता जगाचं लक्ष लागून राहिलं असून लवकरच भारत नवा इतिहास रचणार आहे. 

[ad_2]

Related posts