Jalna Police Lathi Charge Youth Fire Car In Aurangabad District

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Jalna Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी (01 सप्टेंबर) पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर याठिकाणी दगडफेक आणि लाठीचार्ज करण्यात आल्याचं प्रकार समोर आला होता. दरम्यान, या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटताना पाहायला मिळत आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात देखील आज दिवसभर जालना येथील घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. फुलंब्री येथे एका तरुणाने स्वतःची चारचाकी पेटवून दिली आहे. तर, दुसरीकडे पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून काही आंदोलक शोले स्टाईल आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण आणि शहर दोन्ही ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. 

तरुणाने स्वतःची कार पेटवून दिली….

औरंगाबादच्या फुलंब्रीत देखील आज जालन्यात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजता फुलंब्री टी पॉइंट येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आपली स्वतःची चारचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिली. साबळे यांनी सुरुवातीला आपली कार रस्त्याच्या मध्यभागी आणून उभी केली. त्यानंतर खाली उतरवून पेट्रोल टाकून पेटवून दिली. तसेच जालना येथील घटनेचा निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. त्यांनी साबळे यांच्यासह इतर आंदोलकांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तसेच पोलिसांनी गाडी विझवत रस्त्याच्या बाजूला केली आहे. 

आंदोलक पाण्याच्या टाकीवर….

औरंगाबाद शहरात देखील सकाळपासून ठिकठिकाणी आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. तर शहरातील पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवर काही कार्यकर्त्यांनी चढून आंदोलन सुरु केले आहेत. यावेळी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. तर घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहेत. तसेच, पोलिसांकडून आंदोलकांना खाली उतरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

दिवसभरात कुठे काय झालं? 

  • गंगापूर येथील सकल मराठा समाजच्या वतीने तहसीलदार यांना जालना येथील घटनेच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले.
  • लासूर स्टेशन येथील पोलीस चौकीत मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  • विहामांडवा येथे संभाजी चौकामध्यै जुने टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला.
  • पैठण तालुक्यातील आडुळ येथे सकाळपासून शांततेत बंद पाळण्यात आल्याचे चित्र होते.
  • औरंगाबाद शहरातील सिडको चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
  • वैजापूर येथे मराठा मोर्चाच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठा समाज एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
  • फुलंब्रीत मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आक्रमक पवित्रा घेत चारचाकी जाळली. तसेच सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
  • जालना येथील घटनेनंतर पैठणला रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
  • कन्नड तालुक्यातील औराळा येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने अंदाजे एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आला. तसेच यावेळी जालना येथील घटनेचा निषेध करण्यात आला.
  • वाळूज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध करुन पोलिसांना निवेदन देण्यात आले.
  • शहरातील पुंडलिकनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून आदोलन करण्यात आले. यावेळी माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna Protest : जालन्यातील घटनेचे औरंगाबाद जिल्ह्यात पडसाद, आज ठिकठिकाणी आंदोलनं आणि बंदची हाक

[ad_2]

Related posts