Jalgaon Latest News Maratha, Dhangar Reservation Solved By Central Government, But BJP Does Not Want Says Rohit Pawar

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जळगाव : जालना  (Jalna) येथे 8 सप्टेंबर रोजची शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. यासाठी तेथे असे आंदोलन होवू नये, म्हणून हे सर्व घडवून आणले. मराठा आणि धनगर आरक्षण हे केंद्र सरकारच सोडवू शकतो, पण भाजपला हे प्रश्न सोडवायचे नाही, असा कथित आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. ‘पोलीस कुणाशी तरी फोनवर बोलले आणि त्यानंतर अचानक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना घेवून जायला सुरवात केली. यानंतर आंदोलन सुरू झाल्याचे रोहित पवारांनी सांगत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. 

जळगाव (jalgaon) जिल्हा दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. तसेच सकल मराठा (Maratha Reservation)  समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात देखील रोहित पवार यांनी सहभाग घेतला. यावेळी ते म्हणाले की, जालना येथील आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारकडून त्यांच्यावर दबाव होता. सरकार व त्यांच्या विचारांवर आंदोलकांना विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले नाही. पोलीस कुणाशी तरी फोनवर बोलले आणि त्यानंतर अचानक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आंदोलकांना घेवून जायला लागले. पण पोलिसांवर हल्ला, त्यांनी केला नाही. उलट पोलिसांनी (Maharashtra Police) त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यात महिला, मुल, वरिष्ठ लोक न बघता लाठी हल्ला झाला. आधी पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यानंतर काही आंदोलकांनी दगडफेक केली. राजकीय दृष्ट्या त्यांच्यावर दबाव होता, म्हणून पोलीस असे वागले असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

रोहित पवार म्हणाले की, जालना येथे 8 सप्टेंबर रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. यासाठी तेथे असे आंदोलन होवू नये, म्हणून हे सर्व घडवून आणले. मराठा व धनगर आरक्षण हे केंद्र सरकारच सोडवू शकतो, पण भाजपलाहे प्रश्न सोडवायचे नाही, असा कथित आरोप रोहित पवार यांनी केला. काही महिन्यापूर्वी ST आंदोलन सुरू असतांना सदावर्ते हे भाजपची बाजू घेत होते आणि तेच सदावर्ते मराठा आरक्षण विरोधात काम करत आहे. भाजप वेळखावूपणा करत आहे. कारण ते आरक्षण विरोधी आहेत. या हल्ल्याची जबाबदारी म्हणून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली. 

मुंबई महानगरपालिका भाजप जिंकू शकणार नाही. त्यामुळे ते इलेक्शन पुढे ढकलत आहे. तसेच भविष्यात मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहे. मोदी साहेबांनी NCP ने 70 हजार कोटी घोटाळा केल्याचा आरोप केला. मात्र त्यांनाच त्यांनी सोबत घेतले. भाजपचे नेते आता गप्प बसले. स्पर्धा परीक्षा घेताना विद्यार्थ्यांकडून 1000 फी घेता, कांदाचे पैसे शेतकऱ्यांना देत नाही आणि दुसरीकडे ज्यांना मंत्रीपद देता येत नाही, त्यांना 150-200 कोटीचा निधी दिला जात आहे, मात्र ऐन दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे., अशा अनेक विषयांवर सरकारचे कान टोचले. 

दुष्काळ लवकरच जाहीर करावा…. 

रोहित पवार पत्रकार परिषदेत म्हणाले की, आमच्या पक्षाला डॅमेज नाही तर अजित पवार गटाला डॅमेज झाला आहे. कारण कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी आमच्यासोबत आहे. तर कापसाचे पीक मागच्या वर्षाचे अजून ही तसेच पडून असून त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. जळगाव जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी टँकरची आवश्यकता असताना ठराविक ठिकाणी त्याचा पुरवठा चालू आहे. पीक विविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी तिन्ही मंत्र्यांनी त्यासाठी काम करावे. दुष्काळ लवकरच जाहीर करावा, असे आम्ही सरकारला आवाहन करतो, असे रोहित पवार म्हणाले. तसेच जळगाव जिल्ह्यात व शहरात रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवले जात असून त्यामुळे रस्त्यांच्या समस्या मोठ्या आहेत. यावर देखील काम करणे आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी : 

 

[ad_2]

Related posts