[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
राकेश सिंह असं आरोपी तरुणाचं नाव आहे. तो एमबीए उत्तीर्ण आहे. राकेशचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यानं तिच्यावर दीड लाख रुपये खर्च केले. पण ती तरुणी राकेशला सोडून गेली. त्यानंतर राकेशनं महिलांना फसवून पैसे उकळायचं ठरवलं, अशी माहिती सायबर क्राईमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त हार्दिक माकडिया यांनी दिली.
राकेश सिंहनं मॅट्रिमॉनिअल वेबसाईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून १०० पेक्षा अधिक महिलांची फसवणूक केली. त्यानं महिलांना ब्लॅकमेल करुन, नोकरीचं आश्वासन देऊन लाखो रुपये उकळले. राकेशनं घटस्फोटित महिलांदेखील टार्गेट केलं. नवा जोडीदार शोधत असलेल्या महिलांना त्यानं गंडा घातला.
महिलांची फसवणूक करण्यासाठी राकेशनं विविध प्रकारचे बनाव रचले. कधी तो स्वत:ची ओळख बिझनेसमन म्हणून करुन द्यायचा. कॉर्पोरेट प्रोफेशनल, वरिष्ठ पोलीस अधिकारी, इतकंच नव्हे तर न्यायमूर्ती असल्याची बतावणीदेखील तो करायचा. त्यानं व्हॉट्सऍप डीपीवर महिला पोलीस अधिकाऱ्याचा फोटो ठेवला होतो. या नंबरवरुन तो पीडित महिलेला धमकीचे मेसेज करायचा. हळूहळू तो महिलांचा फसवण्यात पटाईत झाला, अशी माहिती माकडियांनी दिली.
राकेशनं अनेकदा एस्कॉर्ट सेवा वापरली. फसवणूक करुन मिळवलेले पैसे तो आलिशान हॉटेलात राहण्यासाठी वापरायचा. वडोदऱ्यातील एका महिलेनं त्याच्याविरोधात ब्लॅकमेलिंग आणि खंडणी करुन लाखो रुपये उकळल्याची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला भोपाळमधून अटक केली.
राकेश सिंह मॅट्रिमॉनिअल वेबसाईट्सच्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधायचा. त्यांच्याशी चॅट सुरू करायचा. त्यांचा विश्वास संपादन करुन खासगी फोटो मिळवायचा. त्यानंतर त्याच फोटोंच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करायचा. सिंहचे १० ईमेल आयडी असून त्यानं महिलांची फसवणूक करण्यासाठी काहीवेळा स्वत: महिला असल्याही बतावणी केली.
[ad_2]