[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पुणे : जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Reservation Protest) झालेल्या लाठीचार्जनंतर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याशी माध्यमांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. आज ते पुण्यात असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांनी माध्यमांना उत्तर न देता निघून गेले. त्यांच्या या कृत्यामुळे संतापलेल्या आंदोलकांच्या संतापात अधिकच भर टाकू शकते.
चंद्रकांत पाटील हे राज्य शासनाच्या मराठा आरक्षण समन्वयक समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्यातील अंतरावाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जनंतर त्यांनी याबाबत काहीतरी बोलणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे.
शरद पवारांकडून जोरदार टीका
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँंग्रेसचे शरद पवार, उदयनराजे भोसले यांनी थेट जालन्यात जाऊन सर्व जखमी लोकांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आंदोलनात काही मार्ग निघेल याची चर्चा सुरू होती. सर्व व्यवस्थित सुरू असताना पोलिसांना सूचना आल्या आणि पोलिसांनी निर्णय बदलून सरळ सरळ बळाचा वापर करत लाठी हल्ला केला. मुंबईहून आदेश आल्यावर पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला असल्याचा गंभीर आरोपही शरद पवार यांनी केला आहे.
बारामतीत निषेध
जालना येथे मराठा बांधवावर झालेल्या हल्ल्याचा आज बारामतीत निषेध करण्यात आला. बारामतीत अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने बारामतीतील प्रशासकीय इमारतीच्या बाहेर कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. तसेच ज्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्यांना तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच बारामती बंदची हाक आंदोलकांनी दिली.
नेमकं घडलं काय?
जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाण झाली होती. त्यामुळं उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने विरोध झाला. पोलीस आणि आंदोलक यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला.
इतर महत्वाची बातमी-
Jalna Protest : मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
[ad_2]