Nashik Latest News Husband Killed His Wife, Also Husbund Committed Suicide In Surgana Taluka Maharashtra News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने (Husbund Wife) घाव घालत निघृण हत्या केली आहे. तसेच, हत्येनंतर पतीने एक ते दोन किलोमीटरवरील स्वतःच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने सुरगाणा तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी सुरगाणा पोलिसांत (Surgana Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी सुरगाणा तालुक्यात (Surgana) साडूला स्वतःच्या गावी राहायला जा, असे सांगितल्याचा राग आल्याने कुऱ्हाडीने वार करत दुसऱ्या साडूची हत्या (murder) करण्याची घटना घडली होती. अशातच श्रीभुवन येथील घटनेने सुरगाणा तालुका पुन्हा हादरला आहे. जयवंता दळवी आणि मनोहर दळवी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. संशयिताचा मुलगा लक्ष्मण मनोहर दळवी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मनोहर शिवाजी दळवी याने पत्नी जयवंता मनोहर दळवी हिचा राहत्या घरात कुऱ्हाडीचे वार करत ठार केल्याची घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर संशयित आरोपी मनोहर शिवाजी दळवी याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मनोहरला दारुचे व्यसन होते. त्यातून पती पत्नी या दोघांमध्ये नेहमी वाद होत असायचे. 1 सप्टेंबरला दोघांमध्ये याच कारणावरून भांडण झाले. जयवंता ही स्वयंपाक करीत असतांना मनोहरने कु-हाडीने  (Wife Murder) तिच्या मानेवर घाव घातल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. संशयित मनोहरने जागेवरून पळ काढला. आईला तात्काळ सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय केले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी मृत्य घोषित केले. याच दरम्यान मनोहरने गावाजवळील शेतातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरगाणा पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी संशयित मनोहरचा मृतदेह शेतात आढळून आला. दरम्यान दुपारी तीन वाजता पती-पत्नीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. सुरगाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वी खुनाची घटना 

सुरगाणा तालुक्यात काही दिवसांपूर्वी खुनाची घटना समोर आली होती. सूर्यगड येथील माजी सरपंच असलेल्या मनोहर राऊत यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना 16 ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. संशयित हा मयत मनोहर राऊत यांच्या घरी अनेक दिवसांपासून राहत होता. सहा महिन्यांपासून राहत असलेल्या मयत मनोहर राऊत यांनी त्यांना मूळगावी जाण्यास सांगितले. मात्र याचा राग येऊन संशयित साडूने दुसऱ्या साडूचा खून केला. सोबतच मेव्हणीसह पत्नीवर पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली होती. या घटनेने देखील सुरगाणा तालुका हादरला होता. त्यानंतर पती पत्नीच्या या घटनेने पुन्हा सुरगाणा तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik Crime : साडूनेच काढला माजी सरपंच साडूचा काटा, सुरगाणा तालुक्यातील घटना, दोघी बहिणींवर वार

[ad_2]

Related posts