[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जालना : मराठा आंदोलकांकडून जालन्यात सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघालेला नाही. सरकारच्या वतीने राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि आमदार नितेश राणे यांनी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन दिवसांत आरक्षण द्या, तरच उपोषण मागे घेऊ, असा ठाम पवित्रा जरांगे यांनी घेतला. त्यावर दोन दिवसांत आरक्षण शक्य नसल्याचं सांगत महाजन यांनी एक महिन्याची मुदत मागितली. सोबतच आंदोलकांवर झालेला लाठीमार अमानुष असल्याचं सांगत समिती नेमली असली तरी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने प्रक्रियेला खीळ बसल्याचं गिरीश महाजन म्हणाले. एकूणच सरकार आणि मराठा आंदोलकांनी चर्चा निष्फळ ठरलीय.
जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे हे पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, संभाजीराजे, उदयनराजे यांच्यासह अनेकांनी भेट दिली. आज राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन, नितेश राणे हे जालन्यात पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पण मनोज जरांगे यांनी दोन दिवसात मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी केली. त्यावर दोन दिवसात हे शक्य नसून त्यासाठी एका महिन्याचा वेळ द्यावा अशी विनंती केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यसरकार कटीबद्ध असून आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती महाजन यांनी केली.
आंदोलकांची देवेंद्र फडणवीसांशी फोनवरून चर्चा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत फडणवीसांनी आश्वासन दिल्याचं जरांगेंनी सांगितलं. मात्र आरक्षणाचा जीआर निघेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रण दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
मराठा आंदोलन, उद्या काय काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी अंतरवाली सराटी येथे आंदोलकांना भेट देणार आहेत. रविवारी त्यांनी फोनवरून चर्चा केली.
छत्रपती संभाजीनगर शहर बंद.
सकल मराठा समाजाकडून नांदेड बंदची हाक.
सातारा जिल्हा बंदचा मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय.
मराठा समाजातर्फे बार्शी बंदची हाक.
मराठा संघटनेचं हिंगोली बंदचं आवाहन.
चिपळूण – सोमवारी सकाळी 10 वाजता चिपळूण येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे.
संबंधित बातमी :
[ad_2]