World Longest Dinosaur Footprints Tracks Found In Texas Dinosaur Valley State Park; जगातील सर्वात मोठ्या डायनासोरच्या पायाचे ठसे सापडले, ११०० लाख वर्ष जुने, फोटो पाहून धडकी भरेल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

टेक्सास: अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक टेक्सास राज्य सध्या दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळामुळे येथे ‘जगातील सर्वात उंच डायनासोर’च्या पावलांचे ठसे पाहायला मिळाले आहेत. येथे असलेल्या डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमध्ये या पावलांचे ठसे सापडले असून ते ११०० लाख वर्षे जुने असल्याचे सांगण्यात येत आहे. तज्ञ सध्या या पायाचे ठशांची चौकशी करत आहेत.

डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, ज्या ठिकाणी या डायनासोरच्या पायांचे ठसे सापडले आहे ते ठिकाण सहसा पॅलेक्सी नदीचे पाणी आणि चिखलाने झाकलेले असते, परंतु आता अतिउष्णतेमुळे पालक्सी नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी डायनासोरच्या पावलांच्या ठशांनी बनलेला संपूर्ण ट्रॅक दिसला आहे. दुष्काळामुळे डायनासोरच्या पायाचे ठसे सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षी सुमारे ७० ट्रॅक्स सापडले आबेत. WKYC चॅनल ३ नुसार, ‘लोन रेंजर ट्रॅक’ नावाच्या ट्रॅकचा एक भाग जगातील सर्वात लांब डायनासोर ट्रॅकपैकी एक असल्याचे मानले जाते.


देवतांच्या मूर्ती म्हणून शेंदूर लावलं, पण ते तर भलतंच निघालं, हजारो वर्षांपूर्वीचं गुपित उलगडणार
हे कोणत्या डायनासोरच्या पायाचे ठसे आहेत?

फ्रेंड्स ऑफ डायनासोर व्हॅली स्टेट पार्कच्या पॉल बेकरच्या म्हणण्यानुसार, हे तीन बोटांच्या पायाचे ठसे अक्रोकॅन्थोसॉरसचे असू शकतात. हा डायनासोर १५ फूट लांब आणि त्याचे वजन सुमारे सात टन होते. इतर मोठ्या पावलांचे ठसे, हे हत्तीच्या पायाचे ठसे असल्यासारखे दिसतात. ते पावलांचे ठसे ६०-फूट-लांब आणि ४४-टन डायनासोर सॉरोपोडसेडॉनचे असू शकतात, ज्याला पलक्सिसॉरस देखील म्हणतात.

पॉल बेकर म्हणाले, ‘हे आमच्यासाठी सामान्य नाही, परंतु सलग दोन वर्षे उच्च तापमान आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आम्हाला नवीन ट्रॅक शोधण्याची संधी मिळाली आहे. मात्र, मुसळधार पाऊस पडताच या पावलांचे ठसे पाण्याखाली जातील.

चांद्रयान ३ च्या काऊंटडाऊनचा आवाज हरपला !

डायनासोर व्हॅली स्टेट पार्कमध्ये सॉरोपॉड्स आणि थेरोपॉड्सचे डायनासोर पावलांचे ठसे वर्षभर पाहिले जाऊ शकतात. जे फोर्ट वर्थच्या दक्षिणेस ग्लेन रोझमध्ये आहे. डिप्लोडोकस आणि ब्रोंटोसॉरस यांसारख्या शाकाहारी प्रजातींच्या पायाचे ठसे हत्तीच्या पायांसारखे होते. त्याच वेळी, टी-रेक्सप्रमाणे, थेरोपॉड डायनासोरचे पंजे तीन बोटांचे असायचे.

[ad_2]

Related posts