एअरहोस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीला 12 तासांत अटक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईतील (Mumbai) पवई (Powai) परिसरात एअरहोस्टेस तरुणीच्या हत्येप्रकरणी पवई पोलिसांना यश आले आहे. इमारतीतच काम करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.

विक्रम असे आरोपीचे नाव असून तो 40 वर्षांचा आहे. चौकशीनंतर आरोपीने आपल्या हत्येची कबुली दिली आहे.

धारदार शस्त्राने गळा चिरुन या एअरहोस्टेसची हत्या करण्यात आली आहे. रविवारी रात्री हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

रूपल ओग्रे असे मृत तरुणीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. मरोळ येथील के. मारवाह मार्गावरील एन.जी. कॉम्प्लेक्स सोसायटीतील 306 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये रूपल ओग्रे मृतावस्थेत आढळली. ती एअरहोस्टेस होती.

मुळची छत्तीसगडमधील असलेली रुपल एप्रिल 2023 मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली होती. रुपल या फ्लॅटमध्ये तिची बहीण आणि बहिणीच्या पतीसह राहात होती. सहा महिन्यांपूर्वी तिची एअर इंडियामध्ये ट्रेनी एअर होस्टेस म्हणून निवड झाली होती.

आरोपी सोसायटीत साफसफाईचे काम करतो. प्राथमिक तपासामध्ये महिलेचा गळा चिरल्याचे समोर आले आहे. मात्र, आरोपीच्या हातालाही दुखापत झाली आहे.

आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपीला पवई पोलिसांनी 12 तासांत ताब्यात घेतलं आहे.

विक्रम अटवाल असे आरोपीचे नाव असून त्याचे वय 40 आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी पोलिसांकडून सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.

रविवारी आरोपीने रुपलची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पोलीस आरोपी विक्रमकडे कसून चौकशी करत आहेत. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या पत्नीचीही पोलीस चौकशी करत आहेत.


हेही वाचा

मुंबई लोकलमध्ये सर्रासपणे ड्रग्सचे सेवन, व्हिडिओ व्हायरल

[ad_2]

Related posts