India vs Pakistan Asia Cup 2023 Super 4 Match Shifted From Colombo Or Not, Know The Fact Check ; भारत-पाकिस्तानच्या आशिया कपमधील सामन्याचे ठिकाण बदलले, पण नेमकं काय घडलं जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १० सप्टेंबरला होणार आहे. पण या सामन्याचे ठीकाण बदलण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. पण नेमकं घडलं तरी काय, हे आता स्पष्ट झाले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील पहिला सामना पल्लिकल येथे झाला होता. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना समान १ गुण देण्यात आला. आता दोन्ही संघ आशिया कप च्या सुपर ४ फेरीत खेळणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा १० सप्टेंबरला कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. पण १० सप्टेंबरला कोलंबोमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे कोलंबोतील हा सामनाही पावसामुळे रद्द होऊ शकतो, असं संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जर दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामान रद्द झाला तर चाहत्यांना मोठा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे आशिया क्रिकेट कौन्सिलने हा सामान हलवण्याचा विचार केला होता.

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले की, ” आम्हाला काही तासांपूर्वी आशिया क्रिकेट कौन्सिलने सांगितले होते की, पावसामुळे भारत आणि पाकिस्तान हा सुपर ४ मधील सामान कोलंबोमधून हंबानटोटो येथे हलवण्यात येणार आहे. पण एका तासाने त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी आम्हाला सांगितले की, हा सामान हंबानटोटा नाही तर ठरवलेल्या कोलंबोतच होणार आहे. हे नेमकं चाललंय तरी काय, तेच समजत नाही.” पावसामुळे सुरुवातीला हा सामना कोलंबो येथून हलवण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना हंबानटोटा येथे खेळवण्याचा निर्णय झाला होता. पण त्यानंतर आशिया क्रिकेट कौन्सिलने पुन्हा एकदा आपले मन बदलले आणि हा सामना हंबानटोटा येथे न खेळवण्यचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १० सप्टेंबरला होणारा सामना हा कोलंबो येथेच होणार आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १० पावसामुळे हंबानटोटा येथे खेळवण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट कौन्सिलने बदलला आहे.

[ad_2]

Related posts