‘आता एवढा खर्च झालाच आहे तर…’, अन् लग्नमंडपात थेट सासऱ्यानेच केलं होणाऱ्या सूनेशी लग्न

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लग्न म्हटलं तर अनेकदा वाद होणं ही फार काही आश्चर्यकारक बाब नाही. लग्नांमध्ये नाराज झालेले पाहुणे, रुसलेले नातेवाईक, जेवण न आवडल्याने नावं ठेवणारी मंडळी असे अनेकजण असतात. यातील काही वाद हे पाहुणे आपापसात कुजुबूज करत असल्याने समोर येत नाहीत. पण काही वाद मात्र सर्वांसमोर होतात आणि कुटुंबीयांची फजिती होती. पण जेव्हा नवरदेव, नवरीमुलगी यांच्याशी संबंधित वाद होते तेव्हा मात्र मोठी अडचण निर्माण होते. त्यात जर लग्नाआधी नवरामुलगा किंवा नवरीमुलगी यांच्यापैकी कोणी पळून गेलं तर…

ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाईटच्या एका रिपोर्टनुसार, इंडोनेशियाच्या साउथ हलमोहरा येथील जायकोटामो गावातील एका धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे लग्नाच्या काही क्षण आधीच नवरदेव पळून गेला. यानंतर एकच खळबळ उडाली होती. 

लग्न लागण्यासाठी काही मिनिटं शिल्लक असतानाच नवरदेव पळून गेल्याने मुलीच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला होता. यानंतर लग्नमंडपात एकच गदारोळ सुरु झाला होता. मुलीच्या कुटुंबीयांसाठी ही फार लाजिरवाणी बाब होती. त्यांना आपलं तोंड लपवावं लागत होतं. पण याचवेळी नवऱ्यामुलाचे वडील पुढे आले आणि आपण होणाऱ्या सूनेशी लग्न करण्यास तयार असल्याचं सांगितलं. हे ऐकल्यानंतर तिथे उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

इंडोनेशियन मीडिया आउटलेट्सनुसार, ही तरुणी एसए, दक्षिण हलमाहेरा येथील जिकोटामो गावातील आहे. गेल्या अनेक काळापासून तिचे नवऱ्यामुलाशी संबंध होते. पण 29 ऑगस्टला लग्नाच्या दिवशीच तो तिला सोडून पळून गेला.

सासऱ्यांनी लग्न करण्याचं सांगितलं अजब कारण

लग्नाची सर्व तयारी झाली होती. तसंच लग्नासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी 25 मिलियन इंडोनेशियन रुपये (1 लाख 35 हजार) खर्च केले होते. मुलीच्या कुटुंबासाठी ही फार मोठी रक्कम होती. लग्नासाठी इतका खर्च केला असताना हा सगळा पैसा वाया जाऊ नये यासाठी तरुणाचे वडील लग्नासाठी तयार झाले होते. त्यांचं हे कारण ऐकल्यानंतर काहींना फारच आश्चर्यकारक वाटत होतं. 

कोणी उडवतंय खिल्ली, तर कोणी करतंय कौतुक

इंडोनेशियात सोशल मीडियावर या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नवरीमुलगी आणि तिचा सासरा विवाहबंधनात अडकताना दिसत आहेत. यानंतर नेटकरी या व्हिडीओवर कमेंट करत असून संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेकजण या लग्नाची खिल्ली उडवत असून, काहीजण नवरीमुलीच्या नशिबावर दु:ख व्यक्त करत आहेत. तर काहीजण सासऱ्याच्या निर्णयाचं कौतुक करत आहेत. 

Related posts